शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

सेंटरीक ए1 : जाणून घ्या सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Published: November 30, 2017 12:53 PM

सेंटरीक मोबाइल्सने भारतीय ग्राहकांसाठी सेंटरीक ए१ हा स्मार्टफोन १०,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.

सेंटरीक मोबाइल्स हा प्रियंका कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ब्रँड आहे. या कंपनीने आता सेंटरीक ए१ या नावाने नवीन स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. हा स्मार्टफोन क्लासिक व्हाईट गोल्ड, एनर्जेटीक ब्लॅक ग्रे आणि व्हायब्रंट गोल्ड या तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. यात क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज ३.० या तंत्रज्ञानाचा सपोर्ट असल्यामुळे अवघ्या ३० मिनिटात ही बॅटरी ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.  यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आलेले आहे.

सेंटरीक ए१ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे ७२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले असून यावर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

 

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल