शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सावधान..! मोबाइलच्या अतिवापराने आळसावतो आपला मेंदू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 00:13 IST

मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही.

नवी दिल्ली: मोबाइल फोनशिवाय जगणे ही कल्पनाच अनेकांना सहन होणार नाही. स्मार्टफोन हा जणू शरीराचा एक अवयव झालाआहे! अठरापगड कामांचा व्याप असला तरी एक डोळा मोबाइलवर असतो आणि मेंदूचा एक कोपरा जणू मोबाइल फोनने व्यापलेला असतो. मात्र मोबाइल फोनवर आपण जितके अवलंबून राहू, त्याच्यात गुंतत जाऊ तेवढा आपला मेंदू आळशी बनतो.मोबाइल कितीही सोयीचा वाटत असला तरी त्याकडेच सतत लक्ष देणे हे शरीरस्वास्थ्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स सक्रिय होतात. हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. श्वास रोखला जातो. मोबाइल फोनवर जे संदेश किंवा कॉल येतात त्यांना प्रतिसाद द्यावा म्हणून शरीरातील घटक अशारितीने सक्रिय होतात असे अजिबात नाही. उलट या गोष्टींना जलद प्रतिसाद देण्याची जी धडपड चालते त्यातल्या धोक्याचे संकेत शरीर अशा लक्षणांद्वारे देत असते.

सर्च इंजिनहून पुस्तक सरसप्रत्येक संकेदाला ६० बीट या वेगाने आपला मेंदू माहिती ग्रहण करु शकतो. कामाचे खूप ओझे असेल तर मेंदूला अधिक ताण द्यावा लागेल. त्यामुळे मोबाइल फोनच्या सहाय्याने यातील अतिरिक्त कामांचा उरक करण्याकडे कोणाचाही कल असू शकतो. मात्र या कृतीमुळे मेंदू शिणतो व आळशीही बनतो. यासंदर्भात काही संशोधनही झाले आहे. संशोधक, विचारवंत असे बुद्धिमान लोक आपल्या मोबाइल फोनमधील सर्च इंजिनचा इतर लोकांपेक्षा खूप कमी वापर करतात. मोबाइलफोनवर इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टीच्या माहितीचा शोध घेतल्याने कोणीही कमी बुद्धिचा ठरत नाही. मात्र बुद्धिमान लोकांना जास्त गोष्टींची माहिती असल्याने ते सर्च इंजिनचा कमी वापर करतात ही वस्तुस्थिती आहे.सतत स्मार्टफोन वापरल्यामुळे मेंदू तणावग्रस्त होतो. बोटेही शिणतात, असा निष्कर्ष स्वित्झर्लंडमधील स्मार्टफोन वापरणाऱ्यांची अलीकडेच पाहणी करण्यात आली, त्यानंतर काढण्यात आला. मोबाइलवर सतत टाइप करत राहिल्याने, सोशल मीडियामध्ये गुरफटून राहिल्याने किंवा स्क्रोलिंग करणाºयांच्या मेंदूवर जास्त आघात होतो.

टॅग्स :MobileमोबाइलHealth Tipsहेल्थ टिप्स