bytedance to store tik tok users data locally | आता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा
आता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा

ठळक मुद्देटिकटॉकची निर्मिती करणारी कंपनी बाइटडान्स  (ByteDance)  भारतात आपलं डेटा सेंटर सुरू करणार आहे.टिकटॉकचे जवळपास दर महिन्याला 120 मिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.टिकटॉकवर डिस्कवर टॅब, लिंक अकाउंटसारखी फीचर्स येणार आहेत.

नवी दिल्ली - टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकची निर्मिती करणारी कंपनी बाइटडान्स  (ByteDance)  भारतात आपलं डेटा सेंटर सुरू करणार आहे. असं पाऊल उचलणारी ही पहिली सोशल मीडिया कंपनी असणार आहे. टिकटॉकचे जवळपास दर महिन्याला 120 मिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.

टिकटॉकवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या अ‍ॅपला नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांना 21 प्रश्न विचारण्यात आले आहेत. जर या प्रश्नांना योग्य उत्तरं मिळाली नाहीत तर टिकटॉकवर बंदी येऊ शकते. त्यानंतर कंपनीने रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. आता मोठे पाऊल उचलण्याची वेळ आली असल्याचे कंपनीने सांगितले. तसेच भारतात आम्ही डेटा सेंटर तयार करत असल्याची घोषणा केली. 

भारतात टिकटॉक प्रचंड लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे टिकटॉकमध्ये अधिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. युजर्सची संख्या वाढवण्यासाठी टिकटॉकमध्ये आता नवीन अपडेट्सही येणार आहेत. टिकटॉकवर डिस्कवर टॅब, लिंक अकाउंटसारखी फीचर्स येणार आहेत. नवीन फीचर रोलआउट झाल्यानंतर टिकटॉक युजर्स आपलं प्रोफाईल गुगल आणि फेसबुक अकाऊंटसोबत लिंक करू शकणार आहेत.

स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिकटॉक आणि हॅलोसारख्या सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी यासाठी एक पत्र लिहिलं आहे. हे दोन्ही अ‍ॅप राष्ट्राच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. समाजाला यापासून धोका असल्याने या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. याआधी टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती.  तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुगल आणि अ‍ॅपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍ॅप हटविण्यास सांगितले होते. 

मद्रास हायकोर्टाने टिकटॉक अ‍ॅपवर घातलेल्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला याबाबत निर्देश देऊन टिकटॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याची सूचना केली होती त्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून गुगल आणि अ‍ॅपलला टिकटॉक अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र यानंतर टिकटॉक अ‍ॅपवर घातलेली बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. 


Web Title: bytedance to store tik tok users data locally
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.