24 तास तुमच्या हृदयावर लक्ष ठेवणारा Smartwatch आला; किंमत 3 हजारांपेक्षा कमी
By सिद्धेश जाधव | Updated: January 18, 2022 19:09 IST2022-01-18T19:08:35+5:302022-01-18T19:09:01+5:30
Budget Smartwatch Zebronics Zeb Fit Me: झेब्रॉनिक्सनं या Smartwatch चे ब्लॅक, ब्लू, ग्रे, रोज पिंक आणि सी ग्रीन असे कलर ऑप्शन सादर केले आहेत.

24 तास तुमच्या हृदयावर लक्ष ठेवणारा Smartwatch आला; किंमत 3 हजारांपेक्षा कमी
Zebronics Zeb-Fit Me स्मार्टवॉच भारतात लाँच झाला आहे. यात SpO2 मॉनिटर आणि हार्ट रेट मॉनिटरिंग असे हेल्थ फीचर्स मिळतात. कंपनीनं या स्मार्टवॉचची किंमत 4,999 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतगर्त हा स्मार्टवॉच फ्लिपकार्टवरून फक्त 2799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. झेब्रॉनिक्सनं या Smartwatch चे ब्लॅक, ब्लू, ग्रे, रोज पिंक आणि सी ग्रीन असे कलर ऑप्शन सादर केले आहेत.
Zebronics Zeb-Fit Me चे स्पेसिफिकेशन
या स्मार्टवॉचमध्ये 1.2 इंचाचा फुल टच-स्क्रीन TFT कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉचच्या उजवीकडे मेन्यू नेव्हिगेशन बटन देण्यात आला आहे. यात व्हॉइस कॉल आणि एसएमएसला सपोर्ट मिळतो. तसेच यावर स्मार्टफोनवरील नोटिफिकेशन देखील बघता येतात. झेब्रॉनिक्सच्या या स्मार्टवॉचमध्ये कॉलर ID आणि कॉल रिजेक्ट फीचर देखील देण्यात आला आहे.
या वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल अर्थात SpO2 सेन्सर आणि हार्ट रेट मॉनिटर फिचर देण्यात आलं आहे. सोबत यात वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, क्रिकेट आणि स्विमिंग असे 14 स्पोर्ट्स मोड मिळतात. यात 50 वॉच फेस देण्यात आले आहेत. तसेच अलार्म आणि स्टॉपवॉच असे बेसिक फीचर देखील मिळतात.कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ 5 मिळते. IP68 रेटिंगमुळे हा स्मार्टवॉच धूळ आणि पाण्यापासून वाचतो. यातील 210mAh ची बॅटरी 35 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते.
हे देखील वाचा:
सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच