Budget Smartwatch: सिंगल चार्जवर वापरा 7 दिवस रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारा Smartwatch; 1500 रुपयांचा डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Published: February 2, 2022 07:30 PM2022-02-02T19:30:36+5:302022-02-02T19:30:43+5:30

Budget Smartwatch Noise Colorfit Icon Buzz: Noise Colorfit Icon Buzz स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर आणि हार्ट रेट सेन्सरसह सादर करण्यात आला आहे.

Budget Smartwatch Noise Colorfit Icon Buzz Launched In India With SpO2 Sensor   | Budget Smartwatch: सिंगल चार्जवर वापरा 7 दिवस रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारा Smartwatch; 1500 रुपयांचा डिस्काउंट 

Budget Smartwatch: सिंगल चार्जवर वापरा 7 दिवस रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारा Smartwatch; 1500 रुपयांचा डिस्काउंट 

Next

Budget Smartwatch Noise Colorfit Icon Buzz: Noise नं आपल्या कलरफिट रेंजमध्ये Noise ColorFit Icon Buzz नावाचा स्मार्टवॉच सादर केला आहे. यात अन्य वॉच फीचर्ससह 24x7 हार्ट रेट ट्रॅकिंग आणि SpO2 मॉनिटर, असे हेल्थ फीचर्स मिळतात. या स्मार्टवॉचदही किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत 1500 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे या वॉचची किंमत 3,499 रुपये होते. हा वॉच जेट ब्लॅक, मिडनाईट गोल्ड, ऑलिव गोल्ड आणि सिल्वर ग्रे कलर ऑप्शनमध्ये कंपनीच्या वेबसाईट, अ‍ॅमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. 

Noise Colorfit Icon Buzz चे स्पेसिफिकेशन 

या वॉचमध्ये 240x280 पिक्सल रेजॉलूशन असलेला 1.69 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 24x7 हार्ट रेट सेन्सर आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हलसाठी SpO2 मॉनिटर असे हेल्थ फीचर्स मिळतात. तसेच यात कॉल, टेक्स्ट मेसेज, ईमेल नोटिफिकेशन आणि हवामानाची माहिती असे फीचर्स देखील मिळतात. यात गुगल असिस्टंट आणि सिरी व्हॉईस कमांड सपोर्ट देण्यात आला आहे. 

या स्मार्टवॉचमधील ब्लूटूथ कॉलिंग फीचर तुम्हाला स्मार्टवॉचवरूनच कॉल करण्यास मदत करतं. त्यासाठी वॉचमधूनच तुम्ही रीसेंट कॉल रेकॉर्ड आणि कॉन्टॅक्ट देखील अ‍ॅक्सेस करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी या वॉचमध्ये ब्लूटूथ 5.1 देण्यात आली आहे. या वॉचमधेही 230mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर सात दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.  

हे देखील वाचा:

Web Title: Budget Smartwatch Noise Colorfit Icon Buzz Launched In India With SpO2 Sensor  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.