एकदा चार्ज करा आणि 7 दिवस वापरा; अनेक हेल्थ फीचर्ससह स्वस्त boAt Smartwatch लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 05:19 PM2022-01-15T17:19:51+5:302022-01-15T17:20:02+5:30

Budget Smartwatch: boAt नं भारतात बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टवॉच लाँच केला आहे. boAt Watch Matrix नावानं बाजारात आलेल्या या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ फीचर्स आहेत.  

Budget Smartwatch boat watch matrix launched with 7 days battery life check price   | एकदा चार्ज करा आणि 7 दिवस वापरा; अनेक हेल्थ फीचर्ससह स्वस्त boAt Smartwatch लाँच 

एकदा चार्ज करा आणि 7 दिवस वापरा; अनेक हेल्थ फीचर्ससह स्वस्त boAt Smartwatch लाँच 

Next

boAt नं भारतात नवीन स्मार्टवॉच लाँच केला आहे. हा स्मार्टवॉच परवडणाऱ्या किंमतीत boAt Watch Matrix नावानं भारतीयांच्या भेटीला आहे. यात SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर, स्लिप मॅपिंग असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सिंगल चार्जवर हा स्मार्टवॉच सात दिवस वापरता येतो, असा दावा कंपनीनं केला आहे.  

boAt Watch Matrix Price In India 

boAt Watch Matrix ची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीनं या स्मार्टवॉचचे तीन कलर व्हेरिएंट बाजारात आणले आहेत. तुम्ही हा ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये विकत घेऊ शकता. हा स्मार्टवॉच ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

boAt Watch Matrix चे स्पेसिफिकेशन्स 

boAt Watch Matrix स्मार्टवॉचमध्ये 1.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 2.5 कर्व्ड डिस्प्ले ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचरला सपोर्ट करतो. यातील SpO2 ब्लड ऑक्सीजन मॉनिटरिंग फिचर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगतो. तर हार्ट रेट सेन्सर तुमच्या हृदयाच्या ठोक्यांना मॉनिटर करतो. सोबत स्लीप मॅपिंग आणि इतर हेल्थ फीचर्सही देण्यात आले आहेत.  

BoAt Watch Matrix सिंगल चार्जवर 7 दिवसांची बॅटरी लाईफ देतो. परंतु ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचरचा वापर केल्यास फक्त 2 बॅटरी टिकते. यात कॉल अलर्ट, कॅमेरा आणि म्यूजिक कंट्रोल इत्यादी फिचर मिळतात. तुम्ही यातील वॉच कस्टमाइज करू शकता. यात 3ATM वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे.  

हे देखील वाचा:

मोबाईलवर फोटो क्लिक करा; घरबसल्या जिंका सोनं आणि भरघोस बक्षीसं, पाहा कसं

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

Web Title: Budget Smartwatch boat watch matrix launched with 7 days battery life check price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.