पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा  

By सिद्धेश जाधव | Published: September 17, 2021 11:29 AM2021-09-17T11:29:07+5:302021-09-17T11:31:33+5:30

Realme Narzo 50A Launch Date: Realme Narzo 50 सीरीज 20-24 सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच केली जाईल. तसेच या स्मार्टफोन सीरिजसह कंपनी दोन AIoT प्रोडक्ट देखील सादर करेल.

Budget Smartphone Realme narzo 50a launch teased officially with mediatek helio g85 chipset  | पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा  

पुढील आठवड्यात येऊ शकतो Realme चा बजेट स्मार्टफोन; Realme Narzo 50A च्या चिपसेटचा खुलासा  

Next
ठळक मुद्दे Narzo 50A मध्ये MediaTek Helio G85 चिपसेटचा वापर करण्यात येईलया फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळू शकतो.

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme आपल्या नवीन बजेट स्मार्टफोन सीरिजवर कमी करत आहे. ही सीरिज Narzo 20 सीरिजची जागा घेण्यासाठी Realme Narzo 50 नावाने सादर केली जाईल. या लाईनअपमधील Narzo 50, Narzo 50A आणि Narzo 50 Pro असे स्मार्टफोन भारत आणि युरोपियन बाजारात सादर करण्यात येतील. आता कंपनीचे सीएमओ फ्रांसिस वॉन्ग यांनी Narzo 50A मध्ये MediaTek Helio G85 चिपसेटचा वापर करण्यात येईल, असे सांगितले आहे. हा एक किफायतशीर प्रोसेसर आहे, त्यामुळे Realme Narzo 50A एक बजेट स्मार्टफोन असू शकतो.  

Narzo 50 सीरीज लाँच डेट  

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, Realme Narzo 50 सीरीज 20-24 सप्टेंबर दरम्यान भारतात लाँच केली जाईल. तसेच या स्मार्टफोन सीरिजसह कंपनी दोन AIoT प्रोडक्ट देखील सादर करेल. ज्यात काल जागतिक बाजारात लाँच झालेल्या रियलमी बँड 2 चा समावेश केला जाऊ शकतो. Realme Narzo 50 सीरीजमध्ये Narzo 50A सह Narzo 50 आणि Narzo 50 Pro स्मार्टफोन तसेच त्यांच्या 4जी आणि 5जी व्हेरिएंटचा समावेश करण्यात येईल.  

Realme Narzo 50A ची डिजाईन  

रियलमी नारजो 50ए च्या रेंडर्सवरून हा फोन प्रीमियम लूकसह सादर केला जाईल असे वाटत आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर चौरसाकृती कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरा सेन्सर्स देण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या खाली नारजोची ब्रॅंडिंग दिसत आहे. बॅक पॅनलचा एक भागावर तिरक्या रेषा आहेत तर दुसरा भाग सपाट दिसत आहे.   

या स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर तीन कडा बेजल लेस डिजाईनसह सादर केला जाईल. फ्रंट पॅनलवरील ‘व्ही’ शेप नॉचमध्ये फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनच्या डाव्या पॅनलवर सिम स्लॉट, उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तळाला 3.5एमएम जॅक, स्पिकर आणि यूएसबी टाईप सी पोर्ट मिळेल. 

Realme Narzo 50A चे स्पेसिफिकेशन्स  

अजूनतरी रियलमी नारजो 50ए स्मार्टफोन्सचे जास्त स्पेक्स समोर आले नाहीत. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळू शकतो. तसेच फ्रंट पॅनलवरील सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असू शकतो. इतर स्पेसिफिकेशन्स Realme Narzo 30A पेक्षा अपग्रेडेड असतील किंवा सामान असतील.   

Web Title: Budget Smartphone Realme narzo 50a launch teased officially with mediatek helio g85 chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.