BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 20:01 IST2024-09-17T19:59:04+5:302024-09-17T20:01:50+5:30
Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल.

BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने 797 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमुळे जिओ आणि एअरटेलचे टेन्शन वाढू शकते. हा 300 दिवसांची वैधता असणारा प्लॅन 1000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत येतो. Jio आणि Airtel चा विचा करता या दोन्ही कंपन्या 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 300 दिवसांचा कुठलाही प्लॅन ऑफर करत नाहीत. बीएसएनएलच्या या प्लॅनसाठी साधारणपणे दिवसाला केवळ 3 रुपये एवढाच खर्च येईल.
300 दिवसांची वैधता पण... -
बीएसएनएलच्या या 797 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर 300 दिवसांची वैधता मिळते. हा प्लॅन फ्री व्हॉईस कॉलिंगसह येतो. मात्र, या प्लॅनमध्ये काही सुविधा मर्यादित कालावधीसाठीच दिल्या जातात. या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच या कालावधीत रोज 2 GB डेटाही मिळतो. तसेच, वापरकर्त्यांना रोज 100 मोफत एसएमएसची सुविधाही मिळते.
खरे तर हा प्लॅन जे दोन सिम कार्ड वापरतात अशा युजर्ससाठी आहे -
60 दिवसांनंतर, वापरकर्ते 300 दिवसांपर्यंत अमर्याद इनकमिंग व्हॉइस कॉल प्राप्त करू शकतात. मात्र, त्यांना आउटगोइंग कॉल करता येणार नाही. खरे तर हा प्लॅन जे दोन सिम कार्ड वापरतात अशा युजर्ससाठी आहे. 60 दिवसांनंतर डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेण्यासाठी युजर्स वेगळे रिचार्ज देखील करू शकतात.