BSNL फ्लावर नहीं फायर है... 'या' प्लॅनमुळं Jio-Airtel चं वाढलं टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 20:39 IST2024-12-08T20:38:43+5:302024-12-08T20:39:07+5:30

स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे लाखो Jio आणि Airtel युजर्स BSNL कडे वळले आहेत.

bsnl rs 2399 recharge plan with 395 days long validity get 2gb daily data  | BSNL फ्लावर नहीं फायर है... 'या' प्लॅनमुळं Jio-Airtel चं वाढलं टेन्शन!

BSNL फ्लावर नहीं फायर है... 'या' प्लॅनमुळं Jio-Airtel चं वाढलं टेन्शन!

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलच्या (BSNL)  स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाचे (Vi) टेन्शन वाढत आहे. BSNL ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक स्वस्त प्लॅन ऑफर केले आहेत, ज्यात फ्री कॉलिंग, डेटा सारखे शानदार बेनिफिट्स दिले जात आहेत. 

स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे लाखो Jio आणि Airtel युजर्स BSNL कडे वळले आहेत. अलीकडेच, BSNL ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केले होते की, जुलै महिन्यापासून अवघ्या चार महिन्यांत 55 लाखांहून अधिक नवीन युजर्स जोडले गेले आहेत. Jio, Airtel आणि Vi चे युजर्स प्लॅन्स महाग असल्यामुळे कमी होत आहेत. तर BSNL कडे वळले आहेत. त्यामुळे BSNL सध्या चर्चेत आहे.

Jio, Airtel आणि Vi ने आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्यापासून, BSNL सतत स्वस्त प्लॅन ऑफर करून संधीचा फायदा घेत आहे. महागडे प्लॅन टाळण्यासाठी युजर्स आता स्वस्त आणि दीर्घ वैधता शोधत आहेत. BSNL ने यादीत असा प्लॅन आणला आहे, ज्यामुळे Jio आणि Airtel चे टेन्शन अनेक पटींनी वाढले आहे. दरम्यान, तुम्ही BSNL चे सिम वापरत असाल तर हा नवीन प्लॅन तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकतो.

BSNL चा शानदार प्लॅन
BSNL या रिचार्ज प्लॅनची वैधता 395 दिवस आहे. याचा अर्थ, जर तुम्ही हा प्लॅन घेतला तर तुम्ही एका वर्षाहून अधिक काळ रिचार्जच्या तणावातून मुक्त व्हाल. BSNL या 13 महिन्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग दिले जाते. यासह, तुम्हाला सर्व नेटवर्कसाठी दररोज 100 विनामूल्य एसएमएस देखील दिले जातात. दरम्यान, हा प्लॅन घेण्यासाठी तुम्हाला फक्त 2399 रुपये खर्च करावे लागतील.

जास्त ब्राउझिंग किंवा ओटीटी स्ट्रीमिंग करणाऱ्यांसाठी BSNL चा हा प्लॅन खास आहे. यामध्ये 395 दिवसांसाठी एकूण 790GB हाय स्पीड डेटा मिळतो. तुम्ही दररोज 2GB पर्यंत हाय स्पीड डेटा वापरू शकता. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला प्लॅनमध्ये 40Kbps इंटरनेट स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये, BSNL युजर्स Hardy Games, Challenger Arena Games, Gameon & Astrotell, Gameium, Zing Music आणि WOW Entertainment चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

Web Title: bsnl rs 2399 recharge plan with 395 days long validity get 2gb daily data 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.