एकदा रिचार्ज करा अन् वर्षभर 'या' सुविधा मिळवा; BSNL ने आणला दमदार प्लॅन, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:30 IST2025-01-05T13:30:07+5:302025-01-05T13:30:19+5:30

BSNL Recharge Plan: BSNL देशभरात वेगाने आपले नेटवर्क वाढवत आहे.

BSNL Recharge Plan: Recharge once and get 'this' facility for a year; BSNL has brought a powerful plan, price is only. | एकदा रिचार्ज करा अन् वर्षभर 'या' सुविधा मिळवा; BSNL ने आणला दमदार प्लॅन, किंमत फक्त...

एकदा रिचार्ज करा अन् वर्षभर 'या' सुविधा मिळवा; BSNL ने आणला दमदार प्लॅन, किंमत फक्त...

BSNL Recharge Plan : गेल्या वर्षी खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या, त्यामुळे कोट्यवधी ग्राहक सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलकडे वळले. BSNL देखील आपला ग्राहक टिकवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्यासाठी देशभरात वेगाने आपले नेटवर्क वाढवत आहे. यासोबतच कंपनी यूजर्ससाठी नवीन प्लॅनही आणत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन वार्षिक प्लॅन लॉन्च केला आहे. 

स्वस्त आणि मोठी वैधता असलेला प्लॅन
BSNL अतिशय कमी दरात आपले प्लॅन लॉन्च करते, त्यामुळे खासगी टेलिकॉम कंपन्यांना मोठे आव्हान मिळत आहे. अशातच बीएसएनएलने 1999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे, जे स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारा प्लॅन शोधत आहेत. तुम्ही आज हा प्लान घेतल्यास तुम्हाला पुढील रिचार्ज 2026 मध्येच करावा लागेल. हा प्लान केवळ बजेट फ्रेंडलीच नाही, तर त्याची वैधता 365 दिवसांपेक्षा जास्त आहे.

योजनेचे फायदे
या प्लॅन अंतर्गत ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, इंटरनेटच्या वापरासाठी या प्लॅनमध्ये एकूण 600GB डेटा मिळणार आहे. हा प्लान जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस सुविधादेखील मिळते.

अतिरिक्त फायदे
बीएसएनएलचा हा प्लॅन फक्त कॉलिंग आणि डेटापुरता मर्यादित नाही, तर यात ग्राहकांना 30 दिवसांसाठी इरॉस नाऊ आणि लोकधुनचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते. 

BSNL ला ग्राहकांची पहिली पसंती
BSNL ने आपल्या परवडणाऱ्या आणि जास्त वैधतेच्या प्लॅनद्वारे Jio, Airtel आणि Vi ला तगडे आव्हान दिले आहे. खासगी कंपन्यांनी त्यांच्या योजनांच्या किमती वाढवल्या आहेत, तर बीएसएनएलने त्यांच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत. ज्या ग्राहकांना दीर्घ वैधता आणि कमी किंमतीत सर्वोत्तम सेवा हवी आहे, त्यांच्यासाठी BSNL चा Rs 1999 चा प्लॅन एक उत्तम पर्याय आहे.

जिओचा वार्षिक प्लॅन
दरम्यान, रिलायन्स जिओचा एक वार्षिक प्लॅन आहे, ज्यासाठी तुम्हाला 3599 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएससह दररोज 2.5GB डेटा मिळतो. मात्र, बीएसएनएलच्या प्लॅनपेक्षा तो नक्कीच महाग आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Web Title: BSNL Recharge Plan: Recharge once and get 'this' facility for a year; BSNL has brought a powerful plan, price is only.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.