BSNL ने आणला नवीन प्लॅन; 187 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् दररोज 1.5 GB डेटा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:59 IST2025-04-30T17:59:06+5:302025-04-30T17:59:18+5:30
खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNL नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत आहे.

BSNL ने आणला नवीन प्लॅन; 187 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग अन् दररोज 1.5 GB डेटा...
BSNL Recahrge Plan: खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्यामुळे लाखो युजर्स BSNL कडे वळत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, कंपनीने देऊ केलेले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स. खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी BSNL नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत आहे. आता कंपनीने 200 रुपयांपेक्षा कमी किमतीचा एक मंथली प्लॅन लॉन्च केला आहे.
BSNL चा नवीन प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलने त्यांच्या एक्स अकाउंटवर या नवीन प्लॅनची माहिती दिली आहे. या प्लॅनची किंमत फक्त 187 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही रोमिंगमध्ये मोफत कॉल करू शकता. तुम्हाला 100 मोफत एसएमएसची सुविधादेखील मिळेल. जिओ, एअरटेल आणि VI देखील असाच प्लॅन ऑफर करते, पण त्यांची किंमत थोडी जास्त आहे.
मोफत लाईव्ह टीव्हीचा आनंद
हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. जर तुम्हाला तुमच्या फोनवर टीव्हीचा आनंद घ्यायचा असेल, तर या प्लॅनमध्ये तुम्हाला BiTV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यात तुम्ही 400 हून अधिक मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेलचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्हाला OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे मंथली प्लॅन
जिओएअरटेल आणि VI देखील असे अनेक प्लॅन ऑफर करते, ज्यात सारखेच फायदे मिळतात, परंतु त्यांची किंमत थोडी जास्त आहे. जिओबद्दल बोलायचे झाले तर, 199 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएसची सुविधा मिळते, तर एअरटेलचा 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लान 299 रुपयांचा आहे. तथापि, यामध्ये दररोज फक्त 1 जीबी डेटा उपलब्ध आहे. तर VI प्लॅनची किंमत देखील 299 रुपये आहे.