दररोज 3GB डेटा, 365 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL चा दमदार प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 20:57 IST2025-01-23T20:56:33+5:302025-01-23T20:57:01+5:30
BSNL Plan : तुम्हाला भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची गरज असेल, तर हा प्लॅन तुमच्या कामाचा आहे.

दररोज 3GB डेटा, 365 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग; BSNL चा दमदार प्लॅन
BSNL Plan : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यापासून अनेकजण BSNL कडे वळत आहेत. BSNL कडे एकापेक्षा एक जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स आहेत. तुम्ही दीर्घ वैधता आणि भरपूर डेटा असलेल्या प्लॅनच्या शोधात असाल, तर BSNL कडे एक असा प्लॅन आहे, जो तुमच्या कामाचा आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा आणि वर्षभराची दीर्घ वैधता मिळते.
BSNL चा 2,999 रुपयांचा प्लान
बीएसएनएलचा हा प्लॅन प्रथमदर्शनी महाग वाटत असला तरी एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. त्याची वैधता पूर्ण 365 दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग देखील मिळते. या प्लॅनद्वारे देशातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित मोफत कॉल करण्याची सुविधा आहे.
प्लॅनमध्ये 1TB पेक्षा जास्त डेटा मिळतो
कंपनी प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा देत आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये एका वर्षात एकूण 1TB पेक्षा जास्त डेटा दिला जात आहे. यासोबत या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस दिले जातात. म्हणजेच हा पॅक वैधता, डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह सर्व सुविधा देतो. हा प्लान Jio आणि Airtel च्या वार्षिक प्लान पेक्षा खूपच स्वस्त आहे.
BSNL चा स्वस्त वार्षिक प्लॅन
BSNL कमी किमतीत वार्षिक योजनादेखील ऑफर करते. कंपनीच्या 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये कंपनी एकूण 600GB डेटा, दररोज 100 SMS आणि मोफत अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देते. या प्लॅनची दैनंदिन किंमत 5 रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे, पण त्यातील फायदे देखील आश्चर्यकारक आहेत.