BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, 600GB डेटासह एका वर्षासाठी मोफत कॉलिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:14 PM2023-09-27T12:14:21+5:302023-09-27T12:14:52+5:30

यामध्ये तुम्हाला डेटासोबत फ्री कॉलिंगची सुविधाही मिळते.

bsnl offering 600gb data and 365 days of validity in plan of 1999 rupees check benefits | BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, 600GB डेटासह एका वर्षासाठी मोफत कॉलिंग!

BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन, 600GB डेटासह एका वर्षासाठी मोफत कॉलिंग!

googlenewsNext

नवी दिल्ली : सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज महाग केले आहे. अशा परिस्थितीत स्वस्त आणि परवडणारा प्लॅन पाहणे कठीण झाले आहे. मात्र, तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे (BSNL) सिम वापरत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण, BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार प्लॅन आणला आहे. यामध्ये तुम्हाला डेटासोबत फ्री कॉलिंगची सुविधाही मिळते.

हा बीएसएनएल प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. यामध्ये, कंपनीने ग्राहकांना OTT बेनिफिट्स देखील उपलब्ध करून दिले आहेत.  BSNL चा हा पैसा वसूल प्लॅन 1999 रुपयांचा आहे. हा प्लॅन घेतल्यानंतर, तुम्ही 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त व्हाल आणि तुम्हाला डेटा, फ्री कॉलिंग आणि OTT बेनिफिट्स देखील मिळतील.

बीएसएनएलचा 1999 रुपयांचा वार्षिक प्लॅन तुम्हाला एकदाच महाग वाटू शकतो, परंतु जर तुम्ही या प्लॅनची ​​मासिक किंमत पाहिली तर त्याची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ एक प्रकारे हा शानदार प्लॅन आहे. जर तुम्ही तुमचा नंबर 1999 रुपयांचा रिचार्ज केला तर कंपनी एका वर्षासाठी 600 जीबी डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्ही 40kbps च्या वेगाने इंटरनेटचा वापर करू शकता.

कंपनी देतेय OTT बेनिफिट्स
या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 100 एसएमएस देखील ऑफर केले जातात. या प्लॅनच्या OTT फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये कंपनी ग्राहकांना Eros Now OTT चे सबस्क्रिप्शन कंपनीकडून मिळेल. मात्र, OTT सबस्क्रिप्शन कंपनी फक्त पहिल्या 30 दिवसांसाठी रिचार्ज ऑफर करत आहे.

Web Title: bsnl offering 600gb data and 365 days of validity in plan of 1999 rupees check benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.