शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

BSNL आणि MTNL युजर्ससाठी चांगली बातमी, लवकरच सुरू होणार 4G सर्व्हिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:53 IST

भारत संचार निगम लिमिटेड लवकरच दिल्ली आणि मुंबईतील एमटीएनएल भागातही 4G सर्व्हिसचा विस्तार केला जाणार आहे. 

नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएलच्या (MTNL) युजर्सना लवकरच 4G सर्व्हिस मिळू शकते. सरकारने या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांसाठी तिजोरी उघडली आहे. भारत संचार निगम लिमिटेड लवकरच दिल्ली आणि मुंबईतील एमटीएनएल भागातही 4G सर्व्हिसचा विस्तार केला जाणार आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीला सहा हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज सरकारी टेलिकॉम कंपनीच्या 4G नेटवर्क विस्तारासाठी वापरले जाईल. दरम्यान, बीएसएनएल संपूर्ण भारतात वेगाने 4G मोबाईल टॉवर बसवत आहे. अलीकडेच, कंपनीने देशभरात 65 हजारांहून अधिक नवीन 4G मोबाइल टॉवर्स सुरू केले आहेत. कंपनीचे उद्दिष्ट वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 1 लाख 4G मोबाईल टॉवर्स सुरू करण्याचे आहे.

बीएसएनएलच्या 4G  सर्व्हिसच्या लाँचिंगसह, 4G ची चाचणी देखील सुरू होईल. कंपनीने यासाठी टाटा कंपनीसोबत भागीदारी केली आहे. सरकारकडून मिळालेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त पॅकेजचा वापर भारतात 4G नेटवर्क विस्तारासाठी केला जाईल. गेल्या वर्षी सरकारने अर्थसंकल्पात बीएसएनएलला 80 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या बजेटचा वापर सरकारी दूरसंचार कंपनीच्या सर्व्हिसला रिव्हाईल करण्यासाठी केला जाईल. 

गेल्या वर्षी जुलैमध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग झाल्यानंतर लाखो युजर्सनी आपले नंबर बीएसएनएलकडे पोर्ट केले होते, परंतु खराब नेटवर्क कव्हरेजमुळे 3 महिन्यांनंतर युजर्स पुन्हा एकदा खाजगी कंपन्यांकडे वळले आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी आपले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी आपले नेटवर्क वेगाने वाढवत आहे.

टॅग्स :MTNLएमटीएनएलBSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान