BSNL चे दोन शानदार रिटायरमेंट प्लॅन्स, ६ महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी आणि बरेच काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 13:07 IST2023-09-21T13:07:03+5:302023-09-21T13:07:33+5:30
कंपनीने 411 रुपये आणि 788 रुपये किंमतीचे दोन नवीन प्लॅन्स आणले आहेत.

BSNL चे दोन शानदार रिटायरमेंट प्लॅन्स, ६ महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी आणि बरेच काही...
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशातील सर्वोच्च दूरसंचार सेवांमध्ये गणली जाते. इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे ती देखील आपल्या युजर्सना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.
दरम्यान, कंपनीने 411 रुपये आणि 788 रुपये किंमतीचे दोन नवीन प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्सला रिटायरमेंट प्लॅन म्हणतात. हे दोन्ही प्लॅन्स डेटा व्हाउचर आहेत, म्हणजेच ते तुमच्या विद्यमान प्लॅनला बूस्ट करणार नाहीत, तर तुमच्या नंबरला अॅक्टिव्हेट करतील. यासाठी तुम्हाला कॉमन व्हाउचर प्लॅन आवश्यक आहे.
सध्या, हे दोन्ही आता ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. हा प्लॅन अशावेळी उपयोगी येतो की, ज्यावेळी तुमच्याकडे दीर्घकालीन डेटा प्लॅन बेस प्लॅन असेल, परंतु डेटा लिमिट पूर्ण झाली आहे.अशा परिस्थितीत हा प्लान तुम्हाला अतिरिक्त डेटा देतो.
411 रुपयांचा प्लॅन
बीएसएनच्या 411 रुपयांच्या डेटा व्हाउचर प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. याचा अर्थ असा की तुम्हाला एकूण 180GB डेटा मिळतो आणि डेली लिमिट पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्पीड 40kbps पर्यंत कमी होते.
788 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या 788 रुपयांच्या डेटा व्हाउचरची व्हॅलिडिटी 180 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्ही एकूण 6 महिन्यांसाठी या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. 788 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्हाला एकूण 360GB डेटा मिळतो. एकदा लिमिट पूर्ण झाले की, इंटरनेटचा स्पीड 40kbps इतका कमी होतो.