भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) यावर्षी नवीन लोगो लाँच केला आहे. याशिवाय या सरकारी टेलिकॉम कंपनीने अनेक नवीन सेवाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे BSNL आता दूरसंचार क्षेत्रातील खासगी कंपन्या रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) यांना टक्कर देणार आहे.
BSNL ने एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्यामुळे Jio आणि Airtel ची चिंता वाढली आहे. अलीकडे BSNL ने इंट्रानेट फायबर टीव्ही (IFTV ) सेवा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत 300 हून अधिक विनामूल्य थेट टीव्ही चॅनेल दाखवले जात आहेत. आता कंपनी BiTV देखील लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
या दोन्ही सेवा BSNL ग्राहकांना मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहण्याची परवानगी देतात. BSNL इंट्रानेट फायबर टीव्ही मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुरू झाली आहे. आता त्याची व्याप्ती पंजाब, हरयाणा आणि पुद्दुचेरीपर्यंत विस्तारली आहे. इंट्रानेट फायबर टीव्ही ही फायबर आधारित इंटरनेट सेवा आहे, तर BiTV ही नॉन-फायबर आधारित इंटरनेट सेवा आहे.
500 हून अधिक विनामूल्य टीव्ही चॅनेलBSNL वायफाय ब्रॉडबँडद्वारे इंट्रानेट फायबर टीव्ही सेवा प्रदान करत आहे. यामध्ये 500 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल अगदी मोफत उपलब्ध आहेत. BSNL च्या फायबर-टू-द-होम (FTTH) ग्राहकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. यासाठी ग्राहकांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. BSNL ची ही सेवा खासगी कंपन्यांसाठी मोठे आव्हान आहे. रिलायन्स JioFiber आणि JioAirFiber द्वारे ब्रॉडबँड सेवा प्रदान करते, तर Airtel च्या ब्रॉडबँड सेवेचे नाव Airtel Xstream Fiber आहे.
BSNL BiTV : 300 हून अधिक विनामूल्य टीव्ही चॅनेलBiTV BSNL मोबाईल ग्राहकांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला 300 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल मोफत पाहण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये प्रीमियम चॅनेलचाही समावेश आहे. हे सध्या पुद्दुचेरीमध्ये लॉन्च केले गेले आहे आणि ते पूर्णपणे विनामूल्य आहे. एकूणच, लाइव्ह टीव्ही चॅनेल दाखवण्याची टेक्नॉलॉजी एकच आहे, फक्त ग्राहकांना ही सेवा देण्याची पद्धत वेगळी आहे.
BSNL चा ग्राहक बेस वाढलाBSNL साठी, IFTV आणि BiTV या दोन्ही महत्त्वाच्या आणि समान सेवा आहेत. मात्र, कंपनीने त्यांना वेगवेगळ्या ब्रँडसह सादर केले आहे. यातील एक विशेषत: फायबर ग्राहकांसाठी आहे, तर दुसरा मोबाइल ग्राहकांसाठी आहे. दूरसंचार क्षेत्रात BSNLच्या ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत आहे. 23 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) अहवालानुसार, BSNL ने ऑक्टोबरमध्ये 5 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.