1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:38 IST2025-10-15T19:36:53+5:302025-10-15T19:38:00+5:30
BSNL ने 4G लॉन्च केल्यानंतर पहिली ऑफर आणली आहे.

1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
BSNL Diwali offer : सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने स्वदेशी 4G नेटवर्क लॉन्च केल्यानंतर पहिल्यांदाच ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त एक विशेष ऑफर आणली आहे. या योजनेत, केवळ 1 रुपयात ग्राहकांना अमर्याद कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळणार आहेत.
कंपनीकडून फ्री सिम कार्ड देण्यात येणार आहेत, म्हणजेच ही ऑफर नवीन ग्राहकांसाठीच लागू असेल. जर आपण Jio किंवा Airtel युजर्स असाल आणि BSNL च्या नवीन 4G नेटवर्कवर स्विच करू इच्छित असाल, तर ही ऑफर तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
This Diwali, light up your life with BSNL Swadeshi connection!
— BSNL India (@BSNLCorporate) October 15, 2025
Celebrate with BSNL Diwali Bonanza @ just ₹1. Get unlimited calls, 2 GB data/day, 100 SMS/Day and a Free SIM.
Offer Valid from15 Oct to 15 Nov 2025 | For new users only#BSNL#BSNLDiwaliBonanza#DiwaliOffer… pic.twitter.com/genxLWRpE4
ऑफर मर्यादित कालासाठीच संधी
ही योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, ती 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत लागू राहील. या कालावधीत जर कोणी BSNL नेटवर्कशी जोडला, तर त्याला फक्त 1 रुपयात खालील सुविधा मिळतील:
अमर्याद कॉलिंग
दररोज 2GB डेटा
100 SMS प्रतिदिन
फ्री सिम कार्ड
ही सुविधा 30 दिवसांसाठी दिली जाईल. त्यानंतर युजर्स स्वतःच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन निवडू शकतात.
बीएसएनएलचा “दिवाळी बोनान्झा”
कंपनीने या ऑफरला “दिवाळी बोनान्झा” असं नाव दिलं आहे. याआधी स्वातंत्र्यदिनाच्या सुमारास BSNL ने अशाच प्रकारची ऑफर आणली होती, पण त्या वेळी कंपनीचं 4G नेटवर्क भारतभर सुरू झालं नव्हतं. आता मात्र BSNL 4G नेटवर्क देशभरात सक्रिय झालं आहे. कंपनीने सुमारे 98,000 टॉवर्सच्या सहाय्याने सेवा सुरू केल्या आहेत. जर तुमच्या भागात BSNL 4G उपलब्ध असेल, तर तुम्ही या दिवाळीत सरकारी नेटवर्ककडे वळण्याची उत्तम संधी साधू शकता.
BSNL नं एअरटेलला मागे टाकलं
गेल्या काही महिन्यांपासून BSNL आपल्या ग्राहकांसाठी आक्रमक धोरणाने स्पर्धात्मक प्लॅन आणत आहे. TRAI (दूरसंचार नियामक प्राधिकरण) च्या ताज्या आकडेवारीनुसार, BSNL ने नवीन ग्राहक जोडण्यात Airtel ला मागे टाकलं आहे. कंपनीचे अधिकारी सांगतात की, पुढील काही महिन्यांत BSNL आपली 5G सेवा देशभरात सुरू करण्याची तयारी करत आहे.