शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

BSNLचा भन्नाट प्लॅन! 90 दिवसांपर्यंत दररोज मिळणार 5GB डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 12:03 IST

भारत संचार निगम लिमिटेड (बीएलएनएल) नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन युजर्ससाठी आणला आहे. 

ठळक मुद्देबीएसएनएल कंपनीचा 599 रुपयांचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लॅन युजर्स देशात कुठेही रिचार्ज करू शकतात.या बीएसएनएलच्या नव्या 599 रुपयांच्या प्लॅनची मर्यादा 90 दिवसांची आहे.

मुंबई : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेकजण घरीच बसून आहेत. तर काही लोक घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत आहेत. यापार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड (बीएलएनएल) नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन युजर्ससाठी आणला आहे. कंपनीने नवीन 599 रुपयांचा प्रीपेड एसटीव्ही प्लॅन आणला असून यामध्ये रिचार्च केल्यानंतर युजर्सला 5 जीबी डेटा मिळणार आहे.

बीएसएनएल कंपनीचा 599 रुपयांचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लॅन युजर्स देशात कुठेही रिचार्ज करू शकतात. संपूर्ण देशभरात हा प्लॅन उपलब्ध आहे. 599 रुपयांचे प्रीपेड एसटीव्ही या प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर ग्राहकाला दररोज 5 जीबीचा डेटा दिला जाणार आहे. 

या बीएसएनएलच्या नव्या 599 रुपयांच्या प्लॅनची मर्यादा 90 दिवसांची आहे. त्यासोबत यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसही दिले जाणार आहे.याआधीही बीएसएनएलने 551 रुपयांचा प्लॅन बाजारात आणला होता. पण, त्या प्लॅनचा फायदा केवळ आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील युजर्सला मिळत होता.

अनलिमिटेड फ्री कॉलिंगगेल्या 551 रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त डेटा दिला जात होता. मात्र,  आता 599 रुपयांचा नवीन प्लॅन एसटीव्हीला अनलिमिटेड कॉम्बो प्लॅन म्हणून घोषित केले आहे. या प्लॅनच्या माध्यमातून देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा पर्याय दिला आहे. यामध्ये दररोज 250 मिनिट युजर्सला मिळणार आहे. तसेच, 5 जीबी हायस्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसही ऑफर करण्यात आले आहेत.

एकूण 450 जीबी हाय स्पीड डेटाबीएसएनएलच्या या नव्या प्लॅनच्या मदतीने देशभरातील सर्व सर्कल्समध्ये रिचार्ज केला जाऊ शकतो. 5 जीबी हायस्पीड डेटा संपल्यानंतर स्पीडमध्ये घट होऊन 80 केबीपीएस राहणार आहे. त्यामुळे या प्लॅनला वर्क फ्रॉम होम म्हटले आहे. कारण,  यामध्ये खूप डेटा दिला आहे. 90 दिवसांच्या मर्यादेमध्ये 450 डेटा युजर्सला मिळणार आहे.

आणखी बातम्या....

मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरुच, सतर्कतेचा इशारा    

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलInternetइंटरनेट