फक्त 3000 रुपयांमध्ये Boat चा Smartwatch लाँच; अशी आहेत Watch Xplorer O2 ची वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Updated: November 11, 2021 17:19 IST2021-11-11T17:19:10+5:302021-11-11T17:19:23+5:30
Budget Smartwatch Boat Watch Xplorer O2 Price: Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच Flipkart वरून विकत घेता येईल. या स्मार्टवॉचमध्ये GPS, SpO2 मॉनीटर, हार्ट रेट सेन्सर, वॉटर रेजिस्टन्स आणि अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

फक्त 3000 रुपयांमध्ये Boat चा Smartwatch लाँच; अशी आहेत Watch Xplorer O2 ची वैशिष्ट्ये
Boat ने काही दिवसांपूर्वी boAt Watch Zenit हा बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच भारतात सादर केला होता. आता कंपनीने बजेटमध्ये Boat Watch Xplorer O2 नावाचा Smartwatch सादर केला आहे. या स्मार्टवॉचमध्ये GPS, SpO2 मॉनीटर, हार्ट रेट सेन्सर, वॉटर रेजिस्टन्स आणि अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच Flipkart वरून विकत घेता येईल.
Boat Watch Xplorer O2 चे स्पेसिफिकेशन्स
Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉचमध्ये 1.3-इंचाचा 240 x 240 पिक्सल रिजोल्यूशन असलेला चौकोनी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉच रनिंग, वॉकिंग, सायकलिंग, हायकिंग, क्लायम्बिंग, फिटनेस, ट्रेडमिल, योगा आणि डायनॅमिक सायकलिंगसह अनेक स्पोर्ट्स मोड्सना सपोर्ट करतो. त्याचबरोबर हार्ट रेट मॉनीटर आणि SpO2 सेन्सर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत.
Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉचमध्ये बिल्ट इन GPS देण्यात आला आहे. हा डिवाइस कॉल आणि मेसेज अलर्ट, मेनूस्ट्रल सायकल ट्रॅकिंग, व्हायब्रेशन अलर्ट, रिमाइंडर आणि अलार्म असे फीचर देखील मिळतात. हा वॉच सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. वॉचसोबत मॅग्नेटिक चार्जर देखील मिळतो.
Boat Watch Xplorer O2 ची किंमत
Boat Watch Xplorer O2 स्मार्टवॉच 2,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. जो ब्लॅक, ग्रे आणि ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.