२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 05:42 IST2025-12-22T05:42:36+5:302025-12-22T05:42:46+5:30
चेन्नई : इस्रो आगामी एलव्हीएम ३ एम ६ मोहिमेंतर्गत ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा दूरसंचार क्षेत्रासाठीचा उपग्रह अंतराळात २४ डिसेंबरला प्रक्षेपित ...

२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
चेन्नई : इस्रो आगामी एलव्हीएम ३ एम ६ मोहिमेंतर्गत ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा दूरसंचार क्षेत्रासाठीचा उपग्रह अंतराळात २४ डिसेंबरला प्रक्षेपित करणार आहे. त्यासंदर्भात अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोने करार केला आहे. हा अत्याधुनिक उपग्रह जगभरातील स्मार्टफोनना हाय-स्पीड सेल्युलर ब्रॉडबँड पुरवण्यासाठी बनविण्यात आला आहे.
एएसटी स्पेस मोबाइल ही स्मार्टफोनना सेवा देणारी, स्पेस-बेस्ड ब्रॉडबँड नेटवर्क उभारणारी पहिली आणि एकमेव कंपनी आहे. ब्रॉडबँड सेवा अब्जावधी लोकांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी हा उपग्रह पाठवला आहे. कंपनीने सप्टेंबर २४ मध्ये ब्लूबर्डचे ५ उपग्रह पाठवले होते. त्यामुळे अमेरिका व अन्य देशांना इंटरनेट सेवा अडथळ्याविना उपलब्ध झाली. (वृत्तसंस्था)
हे आहेत ब्लूूबर्ड ब्लॉक-२ उपग्रहाचे फायदे
उपग्रहामध्ये २२३ चौ.मी.चा फेज्ड ॲरे असून, तो पृथ्वीच्या कक्षेत कमी उंचीवर तैनात केलेला मोठा दूरसंचार उपग्रह ठरणार आहे.
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि एएसटी स्पेस मोबाइल यांच्यातील करारानुसार उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही इस्रोची व्यावसायिक शाखा आहे.
उपग्रहामुळे ४ जी, ५ जी व्हॉइस, व्हिडीओ कॉल्स, संदेश सेवा उपलब्ध होईल. याआधी एलव्हीएम ३ रॉकेटने चांद्रयान यशस्वी केल्या आहेत.