शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरसाठी अब्जाधीश मस्कने शेअर्स विकले, कर्जही काढले; पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 07:16 IST

मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल व कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. 

न्यूयॉर्क : अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला. यासाठी त्यांनी टेस्लाचे काही शेअर्स १५.५ अब्ज डॉलर्सला विकले तर १३ अब्ज डॉलर्सचे कर्जही काढले. मात्र हा प्रसंग ट्विटरमधील वरिष्ठांसाठी दु:खाचा ठरला. मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल व कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. 

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने गुरुवारी ट्विटर खरेदीचा करार पूर्ण केला, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले असून, चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकत मस्क यांनी ट्विटरची साफसफाई सुरू केल्याचे त्यात म्हटले. अग्रवाल, गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल व सल्लागार सीन एजेट यांचा समावेश यांच्यावर तूर्तास मस्क यांची कुऱ्हाड कोसळली.  

नेटकरीही दुभंगलेले मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार बंद केल्याने आणि सोशल मीडिया फर्मच्या चार उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकल्याने, भारतात ट्विटरवर भारतीय वापरकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ट्विटरवरील मजकूर नियंत्रित करण्यास विरोध करणारे मस्क यांच्या आगमनाचे स्वागत करीत आहेत, तर उर्वरित सावध प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

अग्रवाल यांची कारकिर्दट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर ३८ वर्षीय अग्रवाल यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आयआयटी मुंबई आणि स्टॅनफोर्डचे माजी विद्यार्थी अग्रवाल एका दशकापूर्वी ट्विटरमध्ये नोकरीला लागले होते. तेव्हा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ हजाराच्या घरात होती. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर