शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

बिल भरलेय, तरीही रक्कम खात्यातून गायब! तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 06:36 IST

‘वीजबिल न भरल्यामुळे आज रात्री दहा वाजेपासून तुमची विजेची जोडणी तोडली जाणार आहे.

वीजबिल न भरल्यामुळे आज रात्री दहा वाजेपासून तुमची विजेची जोडणी तोडली जाणार आहे. हे टाळण्यासाठी कृपया आमच्या ‘या’ अधिकृत क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा’.. मी माझ्या बिलाचा भरणा करूनही वीज बोर्डाकडून हा संदेश मला आला आहे, माझ्या खात्यातून बिलाची रक्कम डेबिट पडलेली आहे. मी काय करावे ? - एक वाचक

 सध्या अनेक प्रकारचे फ्रॉडस होत असतात. फिशिंग हा आपल्या खासगी माहितीवर हल्ला करण्याचा एक प्रकार आहे. त्यात सहसा वापरकर्ता दुसऱ्याचा डेटा चोरण्यासाठी एक जाळे बनवतो आणि त्यात समोरच्याला अडकवतो. हे करतांना हल्लेखोर, विश्वासार्ह व्यक्ती म्हणून मुखवटा धारण करतात.

 एखाद्या बळीला ईमेल, झटपट संदेश किंवा मजकूर संदेश पाठवतात आणि त्याद्वारे त्या बळीच्या बँक खात्यावर ताबा मिळवून त्यावर डल्ला मारतात. आपल्याला आलेला मेसेज ‘फ्रॉड’ आहे हे नक्की. असेच मेसेजेस टेलिफोनच्या बिलांच्या संदर्भातदेखील आलेले आहेत. आपण बिल भरलेले असेल आणि आपल्या खात्यावरून बिलाची रक्कम डेबिट पडली असेल तर कोणताच प्रश्न नाही. अगदी आपण बिल भरलेले नसेल तरी अशा मेसेजमध्ये सांगितलेल्या फोन नंबरशी संपर्क साधायचे कारण नाही. वीज मंडळ  किंवा टेलिफोन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राचे अधिकृत फोन नंबर त्यांच्या संकेतस्थळावर मिळतात. त्यावर त्यांच्याशी संपर्क साधणे खूपच सोपे आहे. ते न करता अशा फसव्या मेसेजेसमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन केलात तर, अनेकदा तुम्हाला एखादे ॲप डाउनलोड करायला सांगितले जाते.

त्यात तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा नंबर, त्याचा पिन नंबर  इत्यादी महत्त्वाची माहिती भरायला सांगण्यात येते. तुम्ही ही माहिती भरली की, तुमच्या खात्यातून भलीथोरली रक्कम काढून घेतले जाते. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीचा मेसेज करणारा नंबर गायब होतो. सायबर पोलीस त्याचा माग घेण्याचा प्रयत्न करतात, पण एकूणच ते खूप किचकट आणि गुंतागुंतीचे काम असते. त्यामुळे असे मेसेजेस आले तर त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करावे हे उत्तम.

- दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

टॅग्स :electricityवीज