शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
3
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
4
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
5
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
6
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
7
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
8
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
10
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
11
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
12
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
13
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
14
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
15
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
16
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
18
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
19
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
20
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

Facebook युजर्ससाठी मोठी बातमी! आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवू शकता पैसे; जाणून घ्या, काय करावं लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 14:06 IST

big news for facebook users : फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सला (content creators) जाहिरातींद्वारे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंची कमाई करण्यास अनुमती देईल, असे  फेसबुक इंकने (Facebook Inc) गुरुवारी सांगितले.

ठळक मुद्देकंपनीच्या ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, फेसबुक आता क्रिएटर्सला अधिक पैसे कमविण्यास मदत करेल.

नवी दिल्ली : तुम्हाला जर सोशल मीडियावरून (Social Media) पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) लोकांना पैसे मिळविण्याची संधी देत ​​आहे. फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर्सला (content creators) जाहिरातींद्वारे शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंची कमाई करण्यास अनुमती देईल, असे  फेसबुक इंकने (Facebook Inc) गुरुवारी सांगितले. कंपनीने ब्लॉगद्वारे ही घोषणा केली आहे.  (big news for facebook users now you will be able to earn money by making one minute videos)

कंपनीच्या ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, फेसबुक आता क्रिएटर्सला अधिक पैसे कमविण्यास मदत करेल. याठिकाणी क्रिएटर्स शॉर्ट व्हिडिओ बनवून जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकतील, यासाठी कंपनी योजना तयार करत आहे. याशिवाय, लोक कोण-कोणत्या मार्गांनी फेसबुकवर पैसे कमवू शकतात, हे फेसबुकनेही सांगितले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

एक मिनिटांपर्यंतच्या व्हिडीओपासून मिळतील पैसेकंपनी आता सोशल नेटवर्कवरील कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचे पर्याय वाढवत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवरील युजर्स एका मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतील. मात्र, अट अशी आहे की, या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 सेकंदाची जाहिरात प्ले करणे आवश्यक आहे. तसेच, तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओसाठी जवळपास 45 सेकंदाची जाहिरात दाखविली पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्या आवडत्या क्रिएटर्सला त्यांच्या व्हिडिओंमधून अधिक पैसे मिळतील. दरम्यान, यापूर्वी केवळ तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओंवर लोक जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकत होते, ज्यामध्ये एक मिनिटापूर्वी कोणतीही जाहिरात दाखविली जात नव्हती.

पोस्टला पाहिजेत सहा लाख viewsकंपनीचे म्हणणे आहे की, युजर्स किंवा पेजला गेल्या 60 दिवसांत त्यांच्या व्हिडिओमध्ये एकूण 6 लाख views आवश्यकता असणार आहे. लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात सिस्टमसाठी लोकांच्या व्हिडिओजला 60,000 मिनिटांचे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे. कंपनी आपल्या आवडत्या पेजला एक 'स्टार'सह टिप करण्यासाठी नवीन फीचरवरही काम करत आहे. दरम्यान, कंपनी आधीच आपल्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर (Instagram) व्हिडिओंमध्ये जाहिराती दाखवते. त्या जाहिराती दाखविण्यासोबत आता कंपनी नवीन प्रयोग करीत आहे.

टॅग्स :Facebookफेसबुकbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया