शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

सावधान...! तुम्ही शेअर केलेल्या फोटोबरोबर तुमचे लोकेशनही कळते...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 3:55 PM

आपण एखादा फोटो काढतो आणि तो सोशलमिडीयावर शेअरही करतो. मात्र, तुम्हाला माहित आहे का, त्या फोटोसोबत तुमची माहितीही सोशल मिडीयावर जात असते. Exchangeable Image Format म्हणजेच EXIF, हा याचा मूळ स्त्रोत आहे. आजकाल सर्वच मोबाईल किंवा कॅमेऱ्यांद्वारे घेतलेल्या फोटोंमागे हा फोटो केव्हा घेतला, कुठे घेतला, शटरस्पीड, आयएसओ, अॅपार्चर आदींची माहिती ...

आपण एखादा फोटो काढतो आणि तो सोशलमिडीयावर शेअरही करतो. मात्र, तुम्हाला माहित आहे का, त्या फोटोसोबत तुमची माहितीही सोशल मिडीयावर जात असते. Exchangeable Image Format म्हणजेच EXIF, हा याचा मूळ स्त्रोत आहे. आजकाल सर्वच मोबाईल किंवा कॅमेऱ्यांद्वारे घेतलेल्या फोटोंमागे हा फोटो केव्हा घेतला, कुठे घेतला, शटरस्पीड, आयएसओ, अॅपार्चर आदींची माहिती सेव्ह होत असते. यामुळे बऱ्याचदा आपली खासगी माहितीही सर्वांना समजू शकते. 

नुकतेच अभिनेत्री अनुष्का शर्माने गुगलच्या पिक्सल 2 च्या कॅमेऱ्याद्वारे घेतलेले फोटो सोशलमिडीयावर टाकले होते. मात्र, त्यावेळी ते आयफोनवरून टाकल्याचे दिसत होते. तसेच त्याचा डेटाही आयफोनच्या कॅमेऱ्याशी मिळताजुळता होता. यामुळे अनुष्का शर्मा ट्रोल झाली होती. अर्थात ट्रोल करणारे भारतीय नसले तरीही तिला तो फोटो डिलीट करावा लागला होता. अनुष्का गुगलच्या पिक्सल फोनची भारतातील ब्रँड अँम्बॅसिडर आहे. 

फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम सारख्या कंपन्या आपण फोटो अपलोड करतो तेव्हा त्यातील माहीती काढून टाकतात. मात्र, जीमेल किंवा इतर माध्यमाद्वारे फोटो शेअर केल्यास तुमच्या घराचा पत्ताही या फोटोतून कळू शकतो. चला तर मग असे फोटो शेअर करण्याआधी थोडी काळजी घेऊया...

EXIF ची माहिती कशी घालवायची...प्रथम गुगल फोटोचे अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर तुम्हाला ज्या फोटोची माहिती काढून टाकायची आहे तो फोटो अॅपमध्ये ओपन करावा. त्यानंतर फोटोवरील i हा आयकॉन दिसतो त्यावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला EXIF ची माहिती दिसेल. ही माहिती डिलीट करण्य़ासाठी तुम्हाला  EXIF Eraser अॅप मदत करेल. या अॅपमध्ये जाऊन ती इमेज ओपन करावी. त्यानंतर इरेझ EXIF असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती डिलीट झालेली असेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल