शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मोबाईलच्या USB पोर्टमध्ये 'या' गोष्टी लावाल, तर खिसा होईल रिकामा; फोनही पडेल कायमचा बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:19 IST

ज्या मोबाईलला आपण जीवापाड जपतो, त्याच्या एका छोट्याशा छिद्राकडे म्हणजेच 'युएसबी पोर्ट'कडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो.

आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या शरीराचाच एक भाग झाला आहे. पण, ज्या मोबाईलला आपण जीवापाड जपतो, त्याच्या एका छोट्याशा छिद्राकडे म्हणजेच 'युएसबी पोर्ट'कडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. हे पोर्ट फक्त चार्जिंगसाठी नसून ते डेटा ट्रान्सफर आणि बॅटरीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्ही या पोर्टमध्ये कोणतीही बनावट किंवा स्वस्त वस्तू घुसवली, तर तुमचा हजारो रुपयांचा फोन क्षणात भंगार होऊ शकतो.

१. बनावट फास्ट चार्जर: स्वस्त पडेल महागात

अनेकांना सवय असते की, ओरिजनल चार्जर खराब झाला की बाजारातून १००-२०० रुपयांचा कोणताही चार्जर विकत आणतात. हे बनावट फास्ट चार्जर तुमच्या फोनची बॅटरी फुगवू शकतात किंवा फोनचे मदरबोर्ड जाळू शकतात. ओरिजनल चार्जर ६०-७० मिनिटांत फोन चार्ज करतो, तर बनावट चार्जर केवळ गरम करतो, ज्यामुळे चार्जिंग सर्किट कायमचे निकामी होऊ शकते.

२. नकली चार्जिंग केबल: ओव्हरहीटिंगचा धोका

चार्जरप्रमाणेच केबलची गुणवत्ताही महत्त्वाची असते. स्वस्त केबल विजेचा प्रवाह नियंत्रित करू शकत नाहीत. यामुळे फोन चार्ज होताना प्रचंड गरम होतो. अशा केबलमुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते.

३. सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स: ज्युस जॅकिंगचा सापळा

रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट किंवा कॅफेमध्ये मोफत चार्जिंग पाहून आपण लगेच फोन लावतो. पण सावधान! याला 'ज्युस जॅकिंग' म्हणतात. हॅकर्स या केबल्समध्ये मालवेअर बसवतात. जशी तुम्ही केबल लावता, तसा तुमच्या फोनमधील खासगी डेटा, फोटो आणि बँकिंग माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नेहमी स्वतःचे चार्जर आणि पॉवर बँक वापरा.

४. अनसर्टिफाईड ॲक्सेसरीज: फॅन आणि लाईट्सचा नाद नको

सध्या ऑनलाईन मार्केटमध्ये मोबाईलच्या पोर्टमध्ये लागणारे छोटे पंखे, एलईडी लाईट्स किंवा मिनी व्हॅक्यूम क्लीनरची क्रेझ आहे. या वस्तू दिसायला आकर्षक आणि स्वस्त असल्या तरी त्या फोनच्या बॅटरीवर प्रचंड ताण देतात. या अनसर्टिफाईड वस्तूंमुळे निर्माण होणारी उष्णता तुमच्या फोनचे चार्जिंग पोर्ट कायमचे खराब करू शकते.

तुमचा मोबाईल कितीही महागडा असला, तरी त्याचे आयुष्य हे तुम्ही त्याला कशा प्रकारे चार्ज करता यावर अवलंबून असते. केवळ काही रुपये वाचवण्यासाठी बनावट उपकरणे वापरू नका, अन्यथा मोबाईल दुरुस्तीसाठी तुम्हाला हजारो रुपये मोजावे लागतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Beware! Using wrong USB accessories can damage your phone.

Web Summary : Using fake chargers, cables, or public charging stations risks phone damage and data theft. Uncertified accessories strain the battery and can permanently damage the charging port. Protect your phone by using certified products.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन