शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! घराशेजारी 'या' २ गोष्टी असतील तर वारंवार खराब होईल एसी अन् घरातील इलेक्ट्रिक वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:15 IST

घराशेजारी असलेल्या दोन गोष्टी तुमच्या महागड्या होम अप्लायंसेजसाठी 'स्लो पॉयझन' ठरत असल्याचे समोर आले आहे.

उन्हाळा सुरू झाला की घराघरात एसी आणि कुलरचा वापर वाढतो. मात्र, अनेक ग्राहकांची एकच तक्रार असते - "वेळेवर सर्व्हिसिंग करूनही एसीचा गॅस वारंवार लीक का होतो?" दरवर्षी गॅस भरण्यासाठी हजारो रुपये खर्च करूनही ही समस्या सुटत नसेल, तर दोष तुमच्या एसीमध्ये नाही, तर कदाचित तुमच्या घराशेजारील वातावरणात असू शकतो. घराशेजारी असलेल्या दोन गोष्टी तुमच्या महागड्या होम अप्लायंसेजसाठी 'स्लो पॉयझन' ठरत असल्याचे समोर आले आहे.

काय आहे यामागचे विज्ञान?

आयआयटी मद्रासचे निवृत्त केमिकल इंजिनीअरिंग प्रोफेसर टी. स्वामीनाथन यांनी यामागचे रंजक पण भीतीदायक शास्त्र उलगडले आहे. त्यांच्या मते, साचलेल्या सांडपाण्यातून किंवा नाल्यातून 'हायड्रोजन सल्फाइड' हा वायू बाहेर पडत असतो. जेव्हा हा वायू हवेतील ओलाव्याशी संपर्क साधतो, तेव्हा त्याचे रूपांतर सौम्य सल्फ्यूरिक ॲसिडमध्ये होते. हे ॲसिड एसीमधील कॉपर पार्ट्सवर प्रक्रिया करते, ज्यामुळे त्या भागाला गंज लागतो आणि कालांतराने बारीक छिद्र पडून गॅस गळती सुरू होते.

हे आहेत उपकरणांचे २ मोठे शत्रू:

१. उघडा नाला : जर तुमच्या घराच्या अगदी जवळ उघडा नाला असेल, तर सावध व्हा. नाल्यातून निघणारे विषारी वायू तांब्यासोबत अतिशय वेगाने रासायनिक प्रक्रिया करतात. एसीचे पाईप्स, वॉशिंग मशीनचे पीसीबी आणि फ्रीजचे कंडेन्सर या वायूंच्या संपर्कात आल्यावर काळे पडू लागतात. यामुळे कॉइलवर गंज चढतो आणि गॅस गळतीची समस्या वारंवार उद्भवते.

२. सीवेज ट्रिटमेंट प्लांट : घराशेजारी एखादा सीवर प्लांट किंवा सांडपाणी प्रक्रिया केंद्र असेल आणि त्याचे व्यवस्थापन योग्य नसेल, तर तिथूनही मोठ्या प्रमाणात घातक वायू बाहेर पडतात. केवळ एसीच नाही, तर टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अंतर्गत सर्किट्सनाही या वायूंमुळे नुकसान पोहोचते.

उपाय काय?

अशा परिस्थितीत वारंवार गॅस भरण्यापेक्षा तज्ज्ञ 'अँटी-कोरोसिव्ह कोटिंग' करण्याचा सल्ला देतात. एसीच्या कॉपर कॉइल्सवर विशेष रसायनाचा थर चढवल्यास गंज लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र, कायमस्वरूपी उपाय म्हणून परिसरातील स्वच्छता आणि ड्रेनेज लाईन बंदिस्त असणे गरजेचे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Beware! These nearby things damage AC and electronics frequently.

Web Summary : Open drains and poorly managed sewage plants release gases like hydrogen sulfide, corroding AC copper parts and damaging electronics. Anti-corrosive coating helps, but proper drainage is crucial.
टॅग्स :Home Applianceहोम अप्लायंस