शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:54 AM

IRCTC ने लोकांना बनावट अ‍ॅपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : आयआरसीटीसी (IRCTC) म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझममुळे सर्वसामान्यांना ऑनलाइन तिकीट बुक करणे खूप सोपे झाले आहे. IRCTC चे एक मोबाइल अ‍ॅप देखील आहे, जे लोकांना आपल्या स्मार्टफोनद्वारे रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा देते. मात्र, सध्या IRCTC चे एक बनावट अ‍ॅप देखील सोशल मीडियात दिसून येत आहे, ज्याद्वारे लोकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे IRCTC ने लोकांना बनावट अ‍ॅपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

लोकांनी बनावट अ‍ॅपबाबत सावधान राहावे. फसवणूक होण्यापासून किंवा कोणत्याही फसवणुकीपासून स्वतःला वाचवा. तसेच, तुम्ही IRCTC चे ओरिजनल अ‍ॅप देखील ओळखू शकता. याबाबत IRCTC कडून अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. IRCTC ने आपल्या अ‍ॅडव्हायझरीत म्हटले आहे की, IRCTC चे बनावट मोबाइल अ‍ॅप लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने मार्केटमध्ये आले आहे. 

काही फसवणूक करणारे यापेक्षा मोठ्या स्तरावर लोकांना नुकसान पोहोचवणाऱ्या लिंक्स पाठवत आहेत. हे लोक बनावट 'IRCTC Rail Connect' मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करत आहेत, असेही अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, IRCTC म्हणणे की ग्राहकांनी IRCTC मोबाईल अ‍ॅप Google च्या Play Store किंवा Apple च्या App Store वरून डाउनलोड करावे. इतर कोणत्याही लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड केल्याने ग्राहकांचे नुकसान होऊ शकते.

असे तपासावे ओरिजनल अ‍ॅप... IRCTC चे ओरिजनल अ‍ॅप ओळखण्यासाठी तुम्हाला Google Play Store किंवा Apple App Store वर जावे लागेल. येथे तुम्हाला IRCTC Rail Connect अ‍ॅप शोधावे लागेल. डाउनलोड करण्यापूर्वी, तुम्ही अ‍ॅपचे डेव्हलपर 'IRCTC ऑफिशियल' आहे का? ते तपासावे. दरम्यान, IRCTC ही भारतीय रेल्वेची एक वेगळी कंपनी आहे. शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीकडे रेल्वे तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग तसेच भारतीय रेल्वेमध्ये खानपान आणि पर्यटन सेवा देण्याची जबाबदारी आहे.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय