आजच्या काळात स्मार्टफोन हा केवळ गॅजेट राहिला नसून तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, जशी महागड्या आणि लोकप्रिय ब्रँड्सची मागणी वाढली आहे, तसाच बनावट स्मार्टफोनचा बाजारही वेगाने विस्तारला आहे. अनेकदा सवलतीच्या नावाखाली किंवा कमी किमतीच्या लालचेपोटी ग्राहक हुबेहूब दिसणारा बनावट फोन खरेदी करतात. पण हा फोन केवळ पैशांचा अपव्यय नसून तुमच्या सुरक्षेसाठीही मोठा धोका ठरू शकतो.
बनावट स्मार्टफोन का आहे धोकादायक?
दिसायला चकचकीत असले तरी बनावट स्मार्टफोनमध्ये निकृष्ट दर्जाचे हार्डवेअर आणि बॅटरी वापरलेली असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या फोनमध्ये आधीच मालवेअर किंवा स्पायवेअर इंस्टॉल केलेले असण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमचे बँक डिटेल्स, पासवर्ड आणि खासगी फोटो चोरीला जाऊ शकतात.
असा ओळखा अस्सल स्मार्टफोन:
१. IMEI नंबर तपासा : प्रत्येक ओरिजनल स्मार्टफोनला एक युनिक 'IMEI' नंबर असतो. तुमच्या फोनच्या डायल पॅडवर *#06# हा कोड डायल करा. जो नंबर स्क्रीनवर येईल, तो फोनचा बॉक्स आणि बिलावर असलेल्या नंबरशी जुळवून पाहा. जर यात तफावत असेल, तर समजून जा की काहीतरी काळंबेरं आहे. तुम्ही सरकारी 'CEIR' पोर्टलवर जाऊनही या नंबरची वैधता तपासू शकता.
२. सॉफ्टवेअर आणि अपडेट्स: अस्सल स्मार्टफोनला कंपनीकडून नियमित सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. जर तुमच्या फोनमध्ये अपडेटचा पर्यायच नसेल किंवा तो अतिशय विचित्र इंटरफेसवर चालत असेल, तर तो फोन नकली असू शकतो. बनावट फोनमध्ये अनेकदा अँड्रॉइडची जुनी आणि छेडछाड केलेली व्हर्जन वापरलेली असतात.
३. हार्डवेअर आणि बिल्ड क्वालिटी: हातात घेतल्यावर बनावट फोन अनेकदा वजनाला हलके आणि 'प्लास्टिक'सारखे वाटतात. डिस्प्लेचा ब्राइटनेस कमी असणे, टच स्लो असणे किंवा कॅमेरा रिझल्ट अतिशय खराब असणे ही बनावट फोनची लक्षणे आहेत. तसेच, असा फोन वापरताना लवकर गरम होतो आणि बॅटरीही झपाट्याने संपते.
कुठून खरेदी करावा फोन?
फसवणूक टाळण्यासाठी नेहमी अधिकृत दुकाने, कंपनीची अधिकृत वेबसाईट किंवा नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करा. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून किंवा अनधिकृत वेबसाईटवरून मिळणाऱ्या अमिषांना बळी पडू नका. थोडीशी सावधानता तुमची कष्टाची कमाई आणि खासगी माहिती सुरक्षित ठेवू शकते.
Web Summary : Fake smartphones pose risks with poor hardware and potential malware. Check IMEI, software updates, and build quality. Purchase from authorized sources to avoid fraud and protect your data.
Web Summary : नकली स्मार्टफोन घटिया हार्डवेयर और संभावित मैलवेयर के साथ जोखिम पैदा करते हैं। IMEI, सॉफ्टवेयर अपडेट और बिल्ड क्वालिटी की जांच करें। धोखाधड़ी से बचने और अपने डेटा की सुरक्षा के लिए अधिकृत स्रोतों से खरीदें।