छोटा आकार आणि अनोख्या डिजाईनसह 5G Phone लाँच; इतकी आहे Balmuda Phone ची किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 03:16 PM2021-11-17T15:16:09+5:302021-11-17T15:16:30+5:30

Balmuda Phone 5G Phone Price: Balmuda Phone 5G Phone जपानमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर देण्यात आला आहे.  

Balmuda phone price launch with 48mp rear camera 6gb ram specification details  | छोटा आकार आणि अनोख्या डिजाईनसह 5G Phone लाँच; इतकी आहे Balmuda Phone ची किंमत 

छोटा आकार आणि अनोख्या डिजाईनसह 5G Phone लाँच; इतकी आहे Balmuda Phone ची किंमत 

Next

जापनीज कंपनी Balmuda ने स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये पदार्पण केले आहे. होम अप्लायन्समध्ये कार्यरत असलेल्या या कंपनीने आपला पहिला फोन Balmuda Phone जापानमध्ये लाँच केला आहे. हा फोन अनोख्या डिजाईनसह सादर करण्यात आला आहे, तसेच या फोनचा आकार देखील कॉम्पॅक्ट आहे. या फोनमध्ये 48MP Camera, 6GB RAM आणि Snapdragon 765 चिपसेट, असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

Balmuda Phone चे स्पेसिफिकेशन  

Balmuda Phone चा आकार 123.69.8x13.7mm इतका कॉम्पॅक्ट आहे आणि वजन फक्त 138 ग्राम आहे. या फोनच्या डिजाईनची खासियत म्हणजे अन्य स्मार्टफोनप्रमाणे यात बॉक्स शेप मिळत नाही. हा फोन कर्व्ड बॅकसह सादर करण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला पंच होल डिस्प्ले मिळतो, तर बॅक पॅनलवर वरच्या बाजूला उजवीकडे सिंगल रियर कॅमेरा तर डावीकडे फिंगरप्रिंट सेन्सर आहे.  

Balmuda Phone फोन अँड्रॉइड 11 वर चालतो. यात 4.9-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह बाजारात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह सिंगल 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यातील 2,500mAh ची बॅटरी टाइप-सी पोर्ट आणि वायरलेस पद्धतीने देखील चार्ज करता येते.  

Balmuda Phone Price 

Balmuda Phone ची किंमत 104,800 जापनीज येन इतकी आहे. ही किंमत जवळपास 67,841 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन जपानमध्ये प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. 26 नोव्हेंबरपासून हा फोन शिप होण्यास सुरुवात होईल. 

Web Title: Balmuda phone price launch with 48mp rear camera 6gb ram specification details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.