भारीच! आता बनवा मनसोक्त Ghibli-Style फोटो; ChatGPT ने इमेज जनरेशन टूल मोफत केले

By संतोष कनमुसे | Updated: April 1, 2025 15:56 IST2025-04-01T14:39:44+5:302025-04-01T15:56:55+5:30

आता तुम्ही कोणत्याही निर्बंधांशिवाय Ghibli Style फोटो तयार करू शकता. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन याबाबत मोठी घोषणा केली आहे.

Awesome Now create your own Ghibli-Style photos ChatGPT makes image generation tool free | भारीच! आता बनवा मनसोक्त Ghibli-Style फोटो; ChatGPT ने इमेज जनरेशन टूल मोफत केले

भारीच! आता बनवा मनसोक्त Ghibli-Style फोटो; ChatGPT ने इमेज जनरेशन टूल मोफत केले

गेल्या काही दिवसापासून इंटरनेटवर फक्त Ghibli चर्चेत आहे. अनेकांनी या स्टाईलचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ओपनएआयच्या नवीन इमेज-जनरेशन अपडेटसह, वापरकर्ते स्टुडिओ घिबलीसारखे दिसणारे एआय क्रिएशन्स शेअर करत आहेत. आतापर्यंत ChatGPT फक्त सशुल्क वापरकर्त्यांना ही सुविधा देत होते आणि फक्त मर्यादित वापरासाठी मोफत होते. आता याबाबत सॅम आल्टमन यांनी मोठी घोषणा केली आहे. 

आता Ghibli मोफत वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध आहे. म्हणजेच आता कोणीही कोणत्याही प्रकारचे एआय-जनरेटेड फोटो तयार करू शकतो, यामध्ये व्हायरल स्टुडिओ घिबली-शैलीतील पोर्ट्रेटचा समावेश आहे, हे आता कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय मिळणार आहे.

Ghibli इमेजचा नाद पडू शकतो महागात; एक छोटीशी चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई

Ghibli Style म्हणजे काय?

स्टुडिओ घिबली हा एक लोकप्रिय जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे, जो अॅनिमेशन दिग्गज हयाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी सुरू केला. हे स्पिरिटेड अवे, माय नेबर टोटोरो आणि हाउल्स मूव्हिंग कॅसल यासारख्या आश्चर्यकारक दृश्ये आणि भावनिकदृष्ट्या तीव्र चित्रपटांसाठी ओळखले जाते. 

फोटो कसा बनवायचा?

चॅट जीपीटीवर Ghibli Style फोटो बनवून घेणे एकदम सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वात आधी तुमच्या मोबाईल फोनवर ChatGPT अॅप उघडा. आता तुम्हाला जो फोटो घिबली स्टाईलमध्ये बनवायचा आहे तो अपलोड करा. यानंतर तुम्हाला "हा फोटो घिबली स्टाईलमध्ये रूपांतरित करा" असे लिहावे लागेल. आता फक्त काही मिनिटे थांबा आणि ChatGPT तुमच्या फोटोचा एक सुंदर घिबली-शैलीचा फोटो तयार करेल. फोटोवर टॅप करा आणि नंतर डाउनलोड/सेव्ह पर्याय निवडा.

Grok वरही इमेज बनवता येणार 

तुम्ही घिबली शैलीतील फोटो तयार करण्यासाठी xAI च्या Grok चा वापर देखील करू शकता. फोटो तयार करण्यासाठी ग्रोक हे आणखी एक सर्वोत्तम एआय टूल आहे. याच्या मदतीने, तुम्ही सुरवातीपासून एक प्रतिमा तयार करू शकता किंवा तुमचा आवडता फोटो अपलोड करू शकता आणि चॅटबॉटला तुमच्या आवडत्या स्टाईलमध्ये फोटो पुन्हा तयार करण्यास सांगू शकता. ग्रोक वापरणे मोफत आहे. 

Web Title: Awesome Now create your own Ghibli-Style photos ChatGPT makes image generation tool free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.