ऑडिओ रिंगटोनचे युग गेले...आता व्हिडिओ रिंगटोन वाजणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 13:07 IST2019-01-26T13:06:33+5:302019-01-26T13:07:07+5:30
या अॅपमध्ये बॉलिवूड व्हिडिओंसह भक्ती संगिताचे व्हिडिओही देण्यात आले आहेत.

ऑडिओ रिंगटोनचे युग गेले...आता व्हिडिओ रिंगटोन वाजणार...
ऐकायला काहीसे नवल वाटेल, पण आता आपल्या स्मार्टफोनवर व्हिडिओ रिंगटोन लावता येणार आहे. यासाठी एक अॅप लाँच झाले असून Vyng असे नाव आहे. या आधी हे अॅप अमेरिकेसह अन्य देशांमध्ये धुमाकूळ घालत होते. हे अॅप नुकतेच भारतातही लाँच झाले आहे.
या अॅपमध्ये बॉलिवूड व्हिडिओंसह भक्ती संगिताचे व्हिडिओही देण्यात आले आहेत. हे व्हिडिओ किंवा तुम्ही तुमचा एखादा व्हिडिओ बनवून तो तुमच्या अॅपवरील अकाऊंटवर अपलोड करू शकता. तसेच इतरांनी बनविलेले व्हिडिओही तुम्ही तुमची रिंगटोन ठेवू शकता. हे अॅप सध्या अँड्रॉईडसाठीच उपलब्ध आहे.
सध्या या अॅपचा वापर 174 देशांमध्ये करण्यात येत असून भारत, नेपाळसह अमेरिकासारख्या देशांचा सहभाग आहे.