HP-Dell च्या अडचणी वाढल्या; फास्ट चार्जिंगसह Asus चे 3 फाडू लॅपटॉप आले भारतात  

By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2022 12:43 PM2022-06-16T12:43:15+5:302022-06-16T12:45:00+5:30

Asus नं भारतात Zenbook S 13 OLED, Vivobook Pro 14 OLED आणि Vivobook 16X असे तीन लॅपटॉप सादर केले आहेत.  

Asus zenbook s 13 oled vivobook pro 14 oled vivobook 16x launched in india with amd ryzen processors check price specifications details  | HP-Dell च्या अडचणी वाढल्या; फास्ट चार्जिंगसह Asus चे 3 फाडू लॅपटॉप आले भारतात  

HP-Dell च्या अडचणी वाढल्या; फास्ट चार्जिंगसह Asus चे 3 फाडू लॅपटॉप आले भारतात  

googlenewsNext

Asus नं भारतात तीन दमदार लॅपटॉप्स सादर केले आहेत. कंपनीनं एका इव्हेंटमधून Zenbook S 13 OLED, Vivobook Pro 14 OLED आणि Vivobook 16X हे तीन लॅपटॉप भारतीयांच्या भेटीला आणले आहेत. तिन्ही लॅपटॉप AMD Ryzen प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंगसह येतात.  

Asus Zenbook S 13 OLED  

Asus Zenbook S 13 OLED मध्ये 13.3 इंचाचा 2.8K (2,880×1,800 पिक्सल) ओलेड डिस्प्ले मिळतो. लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 7 6800U प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे, सोबत 16GB LPDDR5 RAM आणि 1TB स्टोरेज आहे. या मॉडेलमध्ये Dolby Vision सपोर्ट आणि MIL-STD 810H मिल्ट्री-ग्रेड प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. ऑडियोसाठी यात ड्युअल-स्पिकर्स आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट मिळतो. लॅपटॉपमधील 67Whr ची बॅटरी, 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3 USB 3.2 Gen 2 Type-C पोर्ट आणि 3.5mm कॉम्बो ऑडियो जॅकचा समावेश करण्यात आला आहे.  

Asus Vivobook Pro 14 OLED  

या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा 2.8K (2,880×1,800 पिक्सल) ओलेड डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. 16GB DDR4 RAM आणि 512GB PCIe 3.0 SSD स्टोरेजसह यात AMD Ryzen 7 5800H प्रोसेसरची ताकद मिळते. ऑडियोसाठी स्टीरियो स्पिकर्स तर व्हिडीओ कॉलिंगसाठी 720p HD वेबकॅम आहे. यातील 50WHr ची बॅटरी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6, USB 3.2 Gen 2 Type-A, 2 USB 2.0 Type-A, HDMI 1.4 आणि 3.5mm कॉम्बो जॅक मिळतो.  

Asus Vivobook 16X  

असूसच्या लॅपटॉपमध्ये 16 इंचाचा full-HD डिस्प्ले मिळतो, जो 1,920×1,200 पिक्सल रिजोल्यूशन आणि 300 nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर असलेल्या लॅपटॉपमध्ये 16GB DDR4 RAM आणि 512GB स्टोरेज आहे. 720p HD वेबकॅमसह यात 50WHr ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 6, दोन USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट, USB 3.2 Gen 1 Type-C पोर्ट, USB 2.0, Micro HDMI आणि 3.5 combo ऑडियो जॅक असे ऑप्शन आहेत.  

किंमत 

Asus Zenbook S 13 OLED ची किंमत 99,990 रुपये ठेवण्यात आली आहे. Vivobook Pro 14 OLED तुम्ही 59,990 रुपयांमध्ये तर Vivobook 16X 54,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. यांची खरेदी विविध रंगांमध्ये Amazon, Flipkart, Asus e-shop आणि प्रमुख रिटेल स्टोर्समधून करता येईल. 

Web Title: Asus zenbook s 13 oled vivobook pro 14 oled vivobook 16x launched in india with amd ryzen processors check price specifications details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.