शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दोन डिस्प्ले आणि 32GB रॅमसह आसूसचा टचस्क्रीन लॅपटॉप आला, तुमच्या बजेटमध्ये बसतोय का?  

By सिद्धेश जाधव | Published: April 16, 2022 4:39 PM

Asus ZenBook 14X OLED Space Edition लॅपटॉप 32GB RAM, Windows 11, Intel 12th Gen Processor सह सादर करण्यात आला आहे.  

Asus नं आपल्या लॅपटॉप पोर्टफोलियोचा विस्तार करत Asus ZenBook 14X OLED Space Edition लॅपटॉप लाँच केला आहे. हा लिमिटेड एडिशन लॅपटॉप अंतराळात पाठवण्यात आलेल्या कंपनीच्या पहिल्या लॅपटॉपच्या 25 व्या अनिव्हर्सरी निम्मिताने सादर करण्यात आला आहे. यात 2 डिस्प्ले, 32GB LPDDR5 RAM, 12th Gen Intel Core i9 12900H सीपीयू आणि Windwos 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते.  

ZenBook 14X OLED Space Edition खूप आधी CES 2022 च्या माध्यमातून जगासमोर आला होता आणि आता हा डिवाइस खरेदी करता येणार आहे. 14 इंचाचा OLED टचस्क्रीन डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 92 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योसह देण्यात आला आहे. तर यातील दुसरा डिस्प्ले लॅपटॉपच्या लीडवर देण्यात आला आहे. हा एक 3.5 इंचाचा OLED कम्पॅनियन जेनव्हिजन मोनोक्रोम डिस्प्ले आहे, जो अ‍ॅनिमेशन आणि टेक्स्ट दाखवू शकतो.  

स्पेसिफिकेशन्स  

Asus ZenBook 14X OLED Space Edition मध्ये 14 इंचाचा 2.8K (2,880x1,800 पिक्सल) टचस्क्रीन OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो HDR कंटेंट आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 12th Gen Intel Core i9 12900H ची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबत इंटेल आयरिश एक्सई ग्राफिक्स आहेत. लॅपटॉप विंडोज 11 प्रो वर वर चालतो. सोबत 32GB LPDDR5 रॅम आणि 1TB M.2 PCIe Gen 4 SSD स्टोरेज मिळते.  

Asus ZenBook 14X OLED Space Edition मध्ये 720p रिजोल्यूशन असलेला वेबकॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल-बँड वाय-फाय 6ई, ब्लूटूथ 5.2, दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट, एक यूएसबी 3.2 जेन 2 टाइप-ए पोर्ट, एक एचडीएमआय 2.0 पोर्ट, एक मायक्रोएसडी कार्ड रीडर आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक आहे. यातील 63Wh लिथियम पॉलीमर बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

किंमत आणि उपलब्धता  

Asus ZenBook 14X OLED Space Edition ची किंमत 1,999 डॉलर्स (जवळपास 1,52,600 रुपये) आहे. सध्या युनाइटेड स्टेट्समध्ये याची विक्री सुरु झाली आहे. हा लॅपटॉप यंदा भारतात देखील येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. 

टॅग्स :Asus Phoneअसूस मोबाइलlaptopलॅपटॉप