18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह आले 2 फाडू फोन; ASUS ROG Phone 5s आणि 5s Pro भारतात घालणार धुमाकूळ 

By सिद्धेश जाधव | Published: February 15, 2022 04:29 PM2022-02-15T16:29:41+5:302022-02-15T16:30:31+5:30

Asus ROG Phone 5s Pro Price In India: कंपनीनं ASUS ROG Phone 5S आणि ASUS ROG Phone 5s Pro फोन्स 18GB RAM, 512GB Storage, Snapdragon 888 Plus चिपसेट आणि 6,000mAh Battery सह सादर केले आहेत.

Asus ROG Phone 5s And Pro Powerful Gaming Smartphone Launched In India Know Price Specification Sale  | 18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह आले 2 फाडू फोन; ASUS ROG Phone 5s आणि 5s Pro भारतात घालणार धुमाकूळ 

18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह आले 2 फाडू फोन; ASUS ROG Phone 5s आणि 5s Pro भारतात घालणार धुमाकूळ 

googlenewsNext

ASUS आपल्या गेमिंग स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनीनं दोन नवीन Gaming Smartphone लाँच केले आहेत. कंपनीनं ASUS ROG Phone 5S आणि ASUS ROG Phone 5s Pro फोन्स 18GB RAM, 512GB Storage, Snapdragon 888 Plus चिपसेट आणि 6,000mAh Battery सह सादर केले आहेत. हे फोन्स 18 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.  

ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro चे स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone 5s मध्ये कंपनीने 20.4:9 अस्पेक्ट रेशियो, 2448 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.78-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनच्या प्रो मॉडेलमध्ये ROG Vision Color PMOLED डिस्प्ले दिला आहे. दोन्ही फोन्स इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतात. या फोन्सच्या डिस्प्लेला कॉर्निग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. 

प्रोसेसिंगसाठी ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro मध्ये सर्व लेटेस्ट आणि वेगवान स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर आणि एड्रेनो 660 जीपीयूचा समावेश आहे. त्याचबरोबर वेगवान LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित आरओजी युआयवर चालतो, जो गेमिंग सेंट्रिक यूआय आहे. 

ASUS ROG Phone 5S च्या दोन्ही मॉडेल्समध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सल Sony IMX686 सेन्सर, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या गेमिंग फोन्समध्ये कंपनीने 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोन्समधील 6,000एमएएचची दमदार बॅटरी 65W HyperCharge फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. 

ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro ची किंमत 

  • ASUS ROG Phone 5s 8GB/128GB: 49,999 रुपये  
  • ASUS ROG Phone 5s 12GB/256GB:  57,999 रुपये  
  • ASUS ROG Phone 5s Pro 18GB/512GB: 79,999 रुपये  

हे तिन्ही मॉडेल 18 फेब्रुवारीपासून शॉपिंग साईट फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील. 

हे देखील वाचा:

Web Title: Asus ROG Phone 5s And Pro Powerful Gaming Smartphone Launched In India Know Price Specification Sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.