15,000 रुपयांच्या शानदार डिस्काउंटसह Asus ROG Phone 3 गेमिंग फोन Flipkart वर उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 05:16 PM2021-11-20T17:16:45+5:302021-11-20T17:16:51+5:30

ASUS ROG Phone 3 Price In India: सेलमध्ये Asus ROG Phone 3 स्मार्टफोन 34,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. ही या फोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे.

Asus ROG Phone 3 gaming phone available on Flipkart with discount of Rs 15000 | 15,000 रुपयांच्या शानदार डिस्काउंटसह Asus ROG Phone 3 गेमिंग फोन Flipkart वर उपलब्ध 

15,000 रुपयांच्या शानदार डिस्काउंटसह Asus ROG Phone 3 गेमिंग फोन Flipkart वर उपलब्ध 

Next

ASUS ROG Phone 3 Price In India: Flipkart वर Mobile Bonanza Sale सुरु आहे, उद्या म्हणजे 21 नोव्हेंबरला या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये विविध स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट आणि डील्स दिल्या जात आहेत. यात बजेट स्मार्टफोनपासून फ्लॅगशिप फोन्सपर्यंत सर्व फोन्सचा समावेश आहे. यापैकी एक ऑफर Asus ROG Phone 3 वर मिळत आहे. या ऑफर अंतर्गत हा फोनच्या खरेदीवर 15,000 रुपयांची बचत करता येईल.  

सेलमध्ये Asus ROG Phone 3 स्मार्टफोन 34,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. ही या फोनच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. लाँचच्या वेळी हा व्हेरिएंट 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता. त्याचबरोबर आयसीआयसीआय बँकेच्या मास्टर कार्ड क्रेडिट कार्डवर 10% आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5% इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येईल.  

ASUS ROG Phone 3 

ASUS ROG Phone 3 मधील 6.59 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर चालतो आणि यात 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 865+ चिपसेट मिळतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 650 जीपीजू देण्यात आला आहे. हा गेमिंग फोन गेमकूल 3 कूलिंग सिस्टम आणि शोल्डर बटनसह सादर करण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी Asus ROG Phone 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा SONY IMX686 प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोनमध्ये 30वॉट फास्ट चार्जिंग असलेली 6,000एमएएचची बॅटरी मिळते.  

Web Title: Asus ROG Phone 3 gaming phone available on Flipkart with discount of Rs 15000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app