आजच्या काळात इन्स्टाग्रामवर रील बनवणं जितकं सोपं आहे, तितकंच ती रील व्हायरल करणं कठीण झालं आहे. अनेक क्रिएटर्स रोज नवनवीन कंटेंट अपलोड करतात, तरीही त्यांच्या व्हिडिओवर जेमतेम १०-२० व्ह्यूज येतात. जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल, तर दोष तुमच्या नशिबाचा नाही, तर इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम समजून घेण्यात तुम्ही कमी पडताय. काही खास रणनीती आणि ट्रिक्स वापरल्या तर तुमची रील अवघ्या काही मिनिटांत हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते.
पहिल्या ३ सेकंदांचा हुक आहे महत्त्वाचा!
इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम अशाच रिल्सला पुढे ढकलतो, ज्या सुरुवातीला जास्त पाहिल्या जातात. म्हणजेच तुमच्या व्हिडिओची सुरुवात इतकी दमदार हवी की लोकांनी स्क्रोल करणं थांबवलं पाहिजे. व्हिडिओच्या पहिल्या ३ ते ५ सेकंदात असा काही 'हुक' किंवा सस्पेन्स ठेवा की दर्शक पूर्ण व्हिडिओ पाहण्यास प्रवृत्त होईल. जितका जास्त वॉच टाइम मिळेल, तितकी रील जास्त व्हायरल होईल.
फक्त ट्रेंडिंग गाणं पुरेसं नाही...
अनेकांना वाटतं की फक्त ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ बनवला की तो व्हायरल होतो, पण हे अर्धसत्य आहे. ट्रेंडिंग गाणं, हॅशटॅग आणि चॅलेंजेस जरूर वापरा, पण त्यामध्ये तुमचा स्वतःचा एक वेगळा अँगल किंवा क्रिएटिव्हिटी दाखवा. लोकांची हुबेहूब कॉपी केलेले व्हिडिओ अनेकदा गर्दीत हरवून जातात. नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करा.
योग्य वेळी पोस्टिंगची जादू
तुम्ही कितीही चांगला व्हिडिओ बनवला आणि तो चुकीच्या वेळी पोस्ट केला तर त्याला व्ह्यूज मिळणार नाहीत. तुमची ऑडियन्स कधी सर्वात जास्त ॲक्टिव्ह असते, हे तुमच्या प्रोफाईलच्या इनसाइट्समध्ये जाऊन तपासा. नेमक्या त्याच वेळी रील अपलोड केल्यास सुरुवातीचा एंगेजमेंट वाढतो आणि व्हिडिओ ट्रेंड होऊ लागतो.
कॅप्शन आणि हॅशटॅगची ताकद
व्हिडिओच्या जोडीला प्रभावी कॅप्शन आणि योग्य हॅशटॅग असणं गरजेचं आहे. कॅप्शनमध्ये असा काही प्रश्न विचारा ज्यामुळे लोक कमेंट करायला मजबूर होतील. तसेच १०-१५ हॅशटॅग लावण्याऐवजी ५ ते १० असे हॅशटॅग वापरा जे तुमच्या विषयाशी संबंधित असतील.
सातत्य आणि प्रेक्षकांशी संवाद
एका रीलने चमत्कार घडण्याची अपेक्षा करू नका. पोस्टमध्ये सातत्य ठेवा आणि तुमच्या फॉलोअर्सच्या कमेंट्सना उत्तर द्या. जेव्हा लोक तुमच्या प्रोफाईलवर जास्त वेळ घालवतात किंवा संवाद साधतात, तेव्हा इन्स्टाग्राम तुमची पोहोच वाढवतं.
Web Summary : Struggling with reel views? Understand Instagram's algorithm! Use compelling hooks in the first seconds, leverage trending audio creatively, post at optimal times, utilize relevant hashtags, and engage consistently with your audience to boost visibility.
Web Summary : रील पर व्यूज के लिए संघर्ष कर रहे हैं? इंस्टाग्राम एल्गोरिदम को समझें! पहले सेकंड में आकर्षक हुक का उपयोग करें, रचनात्मक रूप से ट्रेंडिंग ऑडियो का लाभ उठाएं, इष्टतम समय पर पोस्ट करें, प्रासंगिक हैशटैग का उपयोग करें और दृश्यता बढ़ाने के लिए लगातार दर्शकों के साथ जुड़ें।