मोबाईलमध्ये फेसबुक असो- नसो...तरीही तुम्हाला ट्रॅक करतेय कंपनी...कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:41 PM2019-01-04T13:41:22+5:302019-01-04T13:41:40+5:30

मुंबई : नेटकऱ्यांच्या माहितीची चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेली कंपनी फेसबूक मोबाईलमध्ये त्यांचे अॅप इन्स्टॉल केल्याशिवायही माहिती चोरत असल्याचे समोर आले ...

are you on facebook or not; no matter facebook still stolen your personal data...see how | मोबाईलमध्ये फेसबुक असो- नसो...तरीही तुम्हाला ट्रॅक करतेय कंपनी...कसे?

मोबाईलमध्ये फेसबुक असो- नसो...तरीही तुम्हाला ट्रॅक करतेय कंपनी...कसे?

Next

मुंबई : नेटकऱ्यांच्या माहितीची चोरी करण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेली कंपनी फेसबूक मोबाईलमध्ये त्यांचे अॅप इन्स्टॉल केल्याशिवायही माहिती चोरत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तुमचे फेसबूकवर खाते नसले तरीही ही कंपनी ट्रॅक करत असल्याने खासगीपणा धोक्यात आला आहे.


खासगीपणा ठेवण्याचा दावा जरी ही कंपनी करत असली तरीही एका संशोधनामध्ये हा बाब समोर आली आहे. यासाठी फेसबूक दुसऱ्या अॅपची मदत घेत आहे , जी अॅप फेसबूकशी संबंधीत नाहीत. अशी 23 अॅप ब्रिटनच्या एका संस्थेने शोधली आहेत. ही अॅप बनविताना फेसबूक एसडीके नावाच्या अॅप डेव्हलपिंग टूलचा वापर केला आहे. यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये फेसबूक नसेल किंवा तुमचे फेसबूकवर खाते जरी नसेल तरीही तुमची माहिती फेसबूक चोरत आहे. 


जर्मनीतील लाईपजिग शहरामध्ये झालेल्या 'किऑस कॉम्प्यूटर काँग्रेस'मध्ये या बाबतचा अहवाल मांडण्यात आला आहे. या फेसबूकसाठी माहिती चोरणाऱ्या अॅपमध्ये ड्युलिंगो, ट्रीप अॅडवायझर, इंडीड आणि स्काय स्कॅनर या अॅपचा समावेश आहे. सध्या चारच नावे समोर आलेली असली तरीही अशा एकूण 23 अॅपचा शोध लागला आहे. 


फेसबूक एसडीकेचा वापर केलेली अॅप तुम्ही जेवढ्यावेळा ओपन केली जातात, तेवढ्या वेळा तुमची माहिती फेसबूकला पाठविली जाते. यामध्ये मोबाईलमध्ये साठविलेले फोन नंबर, फोटो, व्हिडिओ, इमेल्स आणि कोणत्या वेबसाईटवर किती वेळ घालवता याचीही माहीती चोरली जाते. तसेच तुम्ही काय सर्च करता यावर देखील लक्ष ठेवण्यात य़ेतो. 
 

Web Title: are you on facebook or not; no matter facebook still stolen your personal data...see how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.