चार्जरविना iPhone विकणं Apple ला पडलं महागात; शाओमी-सॅमसंगवर देखील होणार दंडात्मक कारवाई?
By सिद्धेश जाधव | Updated: April 22, 2022 15:51 IST2022-04-22T15:50:39+5:302022-04-22T15:51:16+5:30
Apple ला iPhone च्या बॉक्समध्ये चार्जर न दिल्यामुळे दंड भरावा लागला आहे. 2020 पासून कंपनी नवीन आयफोन सोबत चार्जर देत नाही.

चार्जरविना iPhone विकणं Apple ला पडलं महागात; शाओमी-सॅमसंगवर देखील होणार दंडात्मक कारवाई?
Apple नं 2020 मध्ये आयफोनच्या बॉक्समध्ये चार्जर न देण्यास सुरुवात केली आहे. निर्माण होणारा इलेकट्रोनिक्स कचरा कमी करण्यासाठी कंपनीनं असा निर्णय घेतला आहे. iPhone 12 आणि iPhone 13 सीरिजचे फोन्स विना चार्जर बाजारात आले आहेत. ही बाब ब्राझीलच्या ग्राहक कायद्यात बसत नाही म्हणून तिथे कोर्टानं चार्जरविना आयफोन विकण्यासाठी ग्राहकाला 1000 डॉलर्स (जवळपास 76,000 रुपये) नुकसान भरपाई देण्यास सांगितली आहे.
म्हणून चार्जर दिला जात नाही
अॅप्पलनंतर सॅमसंग, शाओमी आणि अलीकडेच रियलमीनं देखील स्मार्टफोन्सच्या बॉक्समध्ये चार्जर देणं बंद केलं आहे. यामागे पर्यावरणाचं कारण दिलं जातं, परंतु यात कंपन्यांचा अजून फायदा देखील आहे. बॉक्समध्ये चार्जर नसल्यामुळे त्याचा आकार कमी होतो, कमी जागेत जास्त स्मार्टफोन्स बसतात आणि शिपमेंटच्या खर्चात बचत होते. मोबाईलची किंमत देखील कमी होते, त्यामुळे ग्राहक तो फोन घेण्याचा विचार करतात. तसेच वेगळा चार्जर विकून होणारी कमाई देखील या फायद्यात जोडता येईल.
ग्राहक कायद्याचं उल्लंघन
ब्राजीलच्या कोर्टाच्या निर्णयानुसार, Apple चार्जरविना आयफोन विकून कंज्यूमर लॉचं उल्लंघन करत आहे. त्यामुळे ग्राहकाला 1000 डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी देखील ब्राझीलमध्ये ग्राहक कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे कंपनीला 2 मिलियन डॉलर (जवळपास 15.2 कोटी) चा दंड ठोठावण्यात आला आहे. कदाचित आता कंपनी ब्राझीलमध्ये आयफोन चार्जरसह विकले जाऊ शकतात. आता अशी कारवाई सॅमसंग, शाओमी आणि रियलमीवर देखील होईल की ते पाहावं लागेल.