शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अॅपलने लाँच केली वेगवान iOS 12; जाणून घ्या काय आहे वेगळेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 16:11 IST

नवीन ओएस सुरु होण्यासाठी 40 टक्के, कॅमेरा सुरु करण्यासाठी 70 टक्के, कीबोर्ड सुरु होण्यासाठी 50 टक्के वेगवान असणार आहे.

अॅपलने सोमवारी रात्री iPhone आणि iPad साठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम iOS 12 लाँच केली आहे. आयफोनधारक वाय-फायद्वारे अपडेच करू शकणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की, नवीन ओएस सुरु होण्यासाठी 40 टक्के, कॅमेरा सुरु करण्यासाठी 70 टक्के, कीबोर्ड सुरु होण्यासाठी 50 टक्के वेगवान असणार आहे. याशिवाय जाणून घ्या काय नवे फिचर्स कंपनीने दिले आहेत. 

आयफोनवर नवीन आयओएस इन्स्टॉल केली की काही फिचर्स अशी आहेत जी कधीही पाहिलेली नाहीत. नवीन आयओएस केवळ 5 सी पासून पुढील मोबाईल आणि 2013 पासूनच्या आयपॅडवर उपलब्ध होणार आहे. 

1. स्क्रीन डिटॉक्सटच स्क्रीन असलेल्या मोबाईलची आपल्याला खूप सवय लागली आहे. आयओएस 12 मध्ये आता सारखी वापरण्यात येणारी अॅप दिसू शकणार आहेत. तसेच सेटिंगमध्ये स्क्रीन टाईम, काही अॅपना लिमिट सेट करता येणार आहे. तसेच डीएनडी ची सुविधाही देण्यात येणार आहे. 

2. मेमोजीआयओएस 12 मध्ये अॅनिमोजी फिचर वाढविण्यात येणार आहे. तसेच तुमच्या चेहऱ्याचेही इमोजी बनविण्यात येऊ शकणार आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना त्यांच्या चेहऱ्याचे व्यंगचित्र बनवून त्यात आवाज रेकॉर्ड करून ते नंतर इमोजी म्हणून वापरता येणार आहे. हे अॅनिमेशन इमोजी आयमॅसेजद्वारे किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर पाठविता येणार आहे. 

3. वस्तूचे मोजमापनव्या आयओएस मध्ये कॅमेऱ्याचा वापर करून एखाद्या टेबल किंवा वस्तूचे मोजमाप घेता येणार आहे. सध्याच्या आयफोनमध्ये वास्तविकता दाखविण्याचे फिचर आहे. त्याचा वापर करून मोजमाप घेता येईल. यासाठी मेजर नावाचे अॅप देण्यात आलेले आहे. 

4. एआरARKit 2 च्या मदतीने वापरकर्ते एआर गेम आणि एआर अॅप वापरू शकणार आहेत. म्हणजेच दोन आयफोनधारकांना एखादा गेम खेळायचा असेल तर ते सारख्याच ठिकाणी खेळू शकतात. त्यांच्या स्क्रीनवर सारखेच दृष्य दिसणार आहे. 

5. ग्रुप व्हिडिओ कॉलया फिचरमुळे एक दोघांशी नाही तब्बल 32 जणांशी व्हिडिओ कॉल करता येणार आहे. याचबरोबर अॅनिमोजी आणि मेमोजीही वापरता येणार आहेत.  

टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X