Emoji झालं जुनं आता Memoji चा जमाना; Apple ने लाँच केलं नवं फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 09:07 AM2019-09-25T09:07:05+5:302019-09-25T09:29:10+5:30

इमोजीमुळे चॅटिंगची गंमत वाढते. मात्र आता इमोजी प्रमाणेच मेमोजी (Memoji) आलं आहे.

apple iphone memoji customization in iphone x and iphone 11 | Emoji झालं जुनं आता Memoji चा जमाना; Apple ने लाँच केलं नवं फीचर

Emoji झालं जुनं आता Memoji चा जमाना; Apple ने लाँच केलं नवं फीचर

Next
ठळक मुद्देप्रसिद्ध कंपनी अ‍ॅपलने मेमोजी नावाचं नवं फीचर आणलं आहे.अ‍ॅपलने मागच्या आठवड्यात सॉफ्टवेअर व्हर्जन iOS 13 सोबतच मेमोजी हे फीचर उपलब्ध केलं.मेमोजीचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्स त्यांच्या मर्जीने ते कस्टमाईज करू शकतात.

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांऐवजी अनेकजण इमोजीचा वापर करत असतात. इमोजीमुळे चॅटिंगची गंमत वाढते. मात्र आता इमोजी प्रमाणेच मेमोजी (Memoji) आलं आहे. प्रसिद्ध कंपनी अ‍ॅपलने मेमोजी नावाचं नवं फीचर आणलं आहे. अ‍ॅपलने मागच्या आठवड्यात सॉफ्टवेअर व्हर्जन iOS 13 सोबतच मेमोजी हे फीचर उपलब्ध केलं आहे. हे फीचर WhatsApp वर ही उपलब्ध असणार आहे.  

iOS 13 मध्ये युजर्सना डार्क मोड, व्हिडीओ एडिटींगसाठी पहिल्यापेक्षा जास्त पर्याय आणि अपडेट कॅमेरा  अ‍ॅप, चांगली प्रायव्हसी पॉलिसी सेटींग मिळणार आहे. मेमोजी लाँच करताना वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स याचा वापर हा वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी करू शकतात. कंपनीने हे नवं फीचर केवळ  iPhone X आणि त्यानंतरच्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. 

Memoji Stickers  अ‍ॅपलच्या iPhone X, iPhone XR, iPhone XS, iPhone XS Max, iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max यामध्ये आहे. मेमोजीचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्स त्यांच्या मर्जीने ते कस्टमाईज करू शकतात. तसेच मेमोजीच्या केसांचा, ओठांचा आणि डोळ्यांचा रंग बदलता येतो. तसेच युजर्स त्यांना हवं असल्यास त्याला विविध अ‍ॅक्सेसरीजने सजवू शकतात. 

WhatsApp वर iPhone युजर्ससाठी Memoji वापरण्याची पद्धत 

- सर्वप्रथम WhatsApp चा मेसेज बॉक्स ओपन करा. 

- कोणत्याही चॅट बॉक्समध्ये जाऊन उजव्या दिशेला कॉर्नरमध्ये दिसणाऱ्या मल्टिपल फेसवाल्या आयकॉनवर क्लिक करा. 

- आयकॉनवर क्लिक केल्यानंतर युजर्स त्यांना हवं असलेले मेमोजी निवडू शकतात. 

- मेमोजी आपल्य़ा आवडीनुसार किंवा मूडनुसार कस्टमाईज करू शकता. 

अ‍ॅपल आयफोन 11 सीरिज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये तीन फोन्सचा समावेश आहे. iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max या महिन्याच्या अखेरीस भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील. अ‍ॅपल आपल्या iPhone 11 सीरिज सोबतच अ‍ॅपल टीव्ही प्लस आणि वॉचसारखे अनेक इलेक्ट्रीक प्रोडक्ट लाँच केलं आहे. युजर्ससाठी अ‍ॅपल टीव्ही प्लसची घोषणा करण्यात आली असून 1 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आयफोन, आयपॅड तसेच मॅक या उपकरणांमध्ये अ‍ॅपल टीव्हीचा पर्याय देण्यात आला आहे.

 

Web Title: apple iphone memoji customization in iphone x and iphone 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.