शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Apple iPhone Event : टिम कुकने लॉन्च केली अ‍ॅपल वॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:25 PM

सीईओ टिम कुक यांनी एलटीई सपोर्टसह अ‍ॅपल वॉचचे लॉचिंग केलं आहे. ही वॉच 19 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कॅलिफोर्निया, दि. 12 : सीईओ टिम कुक यांनी एलटीई सपोर्टसह अ‍ॅपल वॉचचे लॉचिंग केलं आहे. ही वॉच 19 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अ‍ॅपल वॉच जगात प्रथम क्रमांकावर असून, गेल्या तिमाहीत अ‍ॅपल वॉचच्या विक्रीत 50 टक्के वाढ झाली आहे. अ‍ॅपल वॉच वापरणारे जगातील 97 टक्के लोक समाधानी असल्याचे यावेळी कुक यांनी सांगितले.अ‍ॅपलची ही तिसऱ्या श्रेणीतील वॉच तूम्हाला गुगल मॅप दाखवेल, गाणे ऐकवेल, ऐवढेच नाही तर तुम्हाला त्यावरुन कॉलही करता येईल. या वॉचमध्ये तुमच्या ह्दयाचे ठोकेही मोजले जातील. एका मिनिटात किती वेळा श्वास घेतला हेही कळू शकेल. अ‍ॅपलच्या या नव्या वॉचची डिझाईन यावेळी अधिक आकर्षक करण्यात आली आहे. तुमचा अ‍ॅपल फोन घरी विसरला तरी या वॉचमुळे तुमची अडचण होणार नाही. या वॉचमध्ये जवळपास चार कोटी गाण्यांचा संग्रह करता येणार आहे. ही वॉच वॉटरप्रुफ असणार आहे. अ‍ॅपल वॉचमधील पहिल्या श्रेणीतील घडाळ्याची किंमत 249 डॉलर, दुसऱ्या श्रेणीची 329 डॉलर तर तिसऱ्या श्रेणीची 399 डॉलर ऐवढी असणार आहे. तिसऱ्या श्रेणीतील वॉच ही एकप्रकारे तुमचा मनगटावरील मोबाईलच असेल.अ‍ॅपल वॉचच्या लॉचिंगपूर्वी स्टीव्ह जॉब्स थिएटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते म्हणाले की, अ‍ॅपल स्टीव्ह जॉब्स यांचे स्वप्न आपण पूर्ण करत आहे. आगामी काळात जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात आयफोन असेल.

एक हजार व्यक्ती बसतील इतकी स्टीव्ह जॉब्स थिएटरची क्षमता आहे. या वर्षाअखेर पर्यंत अ‍ॅपलचे मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. 75 एकर जमीनीवर अ‍ॅपलचे स्टिव्ह जॉब्स स्पेसशिप आहे, यामध्ये 9 हजाराहून अधिक वृक्ष आहेत.कॅलिफोर्नियातील कुपेरटिनो येथील अ‍ॅपलच्या नव्या कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अ‍ॅपलचा हा कॅम्पस पाहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. स्टीव्ह जॉब्स थिएटरमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच पत्रकारांसाठी स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

- वॉचची वैशिष्ट्ये २२ सप्टेंबर रोजी अ‍ॅपल वॉच सीरिज-३ मार्केटमध्ये उपलब्ध होणारतुमच्या हृदयाचे ठोके वाढले तर अ‍ॅपल वॉच तुम्हाला सुचना देणारअ‍ॅपल वॉच तुमच्या हृदयाचे ठोके ही मोजणारचौपाटीवर जाताना किंवा वॉकिंगवर जाताना तुमचा मोबाइल घरी ठेऊन केवळ घड्याळ हातात घालून जाऊ शकताअ‍ॅपल वॉचमुळे प्रत्येकवेळी तुम्हाला आयफोन सोबत ठेवायची गरज नाहीअ‍ॅपल सीरिज-३ वॉचमध्ये इलेक्ट्रॉनिक सिम असणारअ‍ॅपल सीरिज-३ वॉचमध्ये जलद वायफायसाठी डब्ल्यू२ चीप लावण्यात येणार

 

टॅग्स :Apple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple TVअ‍ॅपल टिव्हीApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X