भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत आतापर्यंत स्वस्त अँड्रॉइड फोन्सचे वर्चस्व पाहायला मिळत होते, मात्र २०२५ मध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. iPhone 16 हा २०२५ मध्ये भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन बनला आहे. विशेष म्हणजे, ज्या अँड्रॉइड फोनची किंमत आयफोनपेक्षा तीन ते चार पटीने कमी आहे, त्यांनाही आयफोनने मागे टाकले आहे.
'काउंटरपॉईंट रिसर्च'नुसार, २०२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत ॲपलने भारतात सुमारे ६५ लाख iPhone 16 युनिट्सची विक्री केली आहे. याच काळात विवोच्या Y29 5G सर्वात लोकप्रिय बजेट फोनची विक्री ४७ लाखांवर मर्यादित राहिली. आयफोनची किंमत विवोच्या फोनपेक्षा तीन पटीने जास्त असूनही ग्राहकांनी आयफोनलाच पसंती दिली आहे.
ॲपलच्या यशाची तीन मोठी कारणे
सुलभ हप्ते (EMI) आणि ऑफर्स: नो-कॉस्ट EMI आणि बँक कॅशबॅकमुळे महागडा आयफोन खरेदी करणे आता सामान्य ग्राहकांसाठीही शक्य झाले आहे.
ब्रँड व्हॅल्यू: भारतीय ग्राहकांमध्ये आता केवळ किंमत नाही, तर ब्रँड स्टेटस आणि फोनच्या परफॉर्मन्सला महत्त्व वाढले आहे.
भारतात निर्मिती : ॲपलने भारतात स्थानिक उत्पादन वाढवल्याने आणि नवीन स्टोअर्स (बेंगळुरू, पुणे, नोएडा) सुरू केल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला आहे.
नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारतात विकल्या गेलेल्या एकूण स्मार्टफोनमध्ये iPhone 15 आणि iPhone 16 चा वाटा ८ टक्के इतका राहिला आहे. एका स्थिर बाजारपेठेत ॲपलने मिळवलेली ही वाढ भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचे संकेत देत आहे.
Web Summary : In 2025, iPhone 16 became India's top-selling smartphone, surpassing cheaper Android phones. Apple sold 6.5 million units due to easy EMIs, brand value, and local manufacturing. This shift indicates evolving consumer preferences.
Web Summary : 2025 में, आईफोन 16 भारत का सबसे ज्यादा बिकने वाला स्मार्टफोन बन गया, जिसने सस्ते एंड्रॉइड फोन को भी पीछे छोड़ दिया। आसान ईएमआई, ब्रांड वैल्यू और स्थानीय विनिर्माण के कारण ऐप्पल ने 65 लाख यूनिट बेचे। यह बदलाव उपभोक्ताओं की बदलती पसंद को दर्शाता है।