अँड्रॉइडच्या चार्जरने चार्ज करता येणार iPhone; USB Type C चार्जिंग पोर्टसह येणार iPhone 14  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:07 PM2021-11-23T13:07:19+5:302021-11-23T13:11:03+5:30

iPhone with USB C Port: Apple आपल्या आगामी iPhone 14 Series मध्ये USB Type C पोर्टचा वापर करू शकते. iPhone 14 Pro मध्ये Type C चार्जिंग पोर्ट दिसला आहे.  

Apple iphone 14 series could come with usb type c charging feature know reason  | अँड्रॉइडच्या चार्जरने चार्ज करता येणार iPhone; USB Type C चार्जिंग पोर्टसह येणार iPhone 14  

अँड्रॉइडच्या चार्जरने चार्ज करता येणार iPhone; USB Type C चार्जिंग पोर्टसह येणार iPhone 14  

Next

iPhone with USB C Port: Apple आपल्या आगामी iPhone 14 Series मध्ये USB Type C चार्जिंग पोर्टचा वापर करू शकते. आतापर्यंत कंपनी लायटनिंग पोर्टचा वापर करत होती. परंतु आता Android डिवाइसेज प्रमाणेच iPhones च्या आगामी फोन्समध्ये टाईप सी पोर्ट दिसू शकतो. काही दिवसांपूर्वी यूएसबी टाईप सी पोर्ट असलेला एक मॉडिफाईड आयफोन चर्चेचा विषय ठरला होता. आता आगामी सर्वच आयफोन या चार्जिंग फीचरसह येऊ शकतात.  

LeaksApplePro आणि iDropNews यांनी iPhone 14 Pro मध्ये Type C चार्जिंग फीचर स्पॉट केले आहे. विशेष म्हणजे Apple ने याआधी आलेल्या MacBook मध्ये देखील USB Type C पोर्ट दिला आहे. Apple च्या या निर्णयामागे सर्वात मोठे कारण युरोपियन युनियनने केलेली घोषणा असल्याची चर्चा आहे.  

काही दिवसांपूर्वी युरोपीयन यूनियनने घोषणा केली होती कि USB Type C प्रत्येक स्मार्टफोनसाठी स्टँडर्ड करण्यात यावा. तसेच ज्या कंपन्या या नियमाचा उल्लंघन करतील त्यांना दंड देखील भरावा लागेल. अ‍ॅप्पलने वेळीच जर यूएसबी टाईप सी चा समावेश केला नाही तर युरोपियन बाजार हातातून जाईल. त्यामुळे आगामी आयफोनमध्ये कंपनी मोठा बदल करू शकते.  

विशेष म्हणजे iPhone मधील लायटनिंग पोर्टच्या तुलनेत USB Type C जास्त वेगाने डेटा ट्रान्सफर करू शकते. यावर्षी आलेला iPhone 13 Pro Max मॉडेल UFS 2.0 ला सपोर्ट करतो. तर Type C सह येणारे फोन UFS 3.0 ला सपोर्ट करतात. जी एक वेगवान टेक्नॉलॉजी आहे.  

Web Title: Apple iphone 14 series could come with usb type c charging feature know reason 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.