iPhone 13 ला सुपरफास्ट 25W चा चार्जर; पण अ‍ॅडॅप्टर, केबलची किंमत वाचून बेशुद्ध व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 07:45 PM2021-07-24T19:45:10+5:302021-07-24T19:48:20+5:30

Apple iPhone 13 launch date, features rumor's: 20W च्या तुलनेत 25W चा फायदा तसा काहीच होणार नाही. वेळ तेवढाच लागण्याची शक्यता आहे. कारण नव्या आयफोनमध्ये बॅटरी आताच्यापेक्षा मोठी दिली जाणार आहे.

Apple iPhone 13 to support 25W wired charging; Adapter, cable price too high | iPhone 13 ला सुपरफास्ट 25W चा चार्जर; पण अ‍ॅडॅप्टर, केबलची किंमत वाचून बेशुद्ध व्हाल

iPhone 13 ला सुपरफास्ट 25W चा चार्जर; पण अ‍ॅडॅप्टर, केबलची किंमत वाचून बेशुद्ध व्हाल

googlenewsNext

अ‍ॅपल (Apple) या जगप्रसिद्ध कंपनीचा आयफोन 13 (iPhone 13) लवकरच बाजारात येणार आहे. या फोनला सुपरफास्ट 25W चा चार्जर असणार आहे. काही मिनिटांत हा फोन चार्ज होईल. तास तासभर चार्ज करण्याची गरज लागणार नाही. परंतू हा चार्जर नेहमीप्रमाणे आयफोन 13 सोबत येणार नाही. तुम्हाला तो विकत घ्यावा लागणार आहे. पण त्याची किंमत ऐकून गांगराल एवढे नक्की. (Apple iPhone 13 to support 25W wired charging, but accesories too expensive.)

चीनमधून याबाबतच्या अफवा उडाल्या आहेत. आयफोन 12 हा 20W च्या चार्जरला सपोर्ट करतो. यामुळे नव्या आयफोनला 25W चा चार्जर मिळेल. सध्याच्या 20W च्या अ‍ॅडॅप्टरची किंमत  1900 रुपये आहे, तर त्याच्या 1 मीटर चार्जिंग केबलची किंमत 3500 रुपये आहे. दोन्ही विकत घेतल्यास 5400 रुपये मोजावे लागतात. तर अ‍ॅपलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर फक्त 30W पॉवर अ‍ॅडॅप्टरची किंमत ही 4900 रुपये आहे. मग केबलची किंमत किती असेल विचारच न केलेला बरा. अशावेळी 25W चा चार्जर या किंमतींच्यामध्ये असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

फरक काहीच पडणार नाही....
20W च्या तुलनेत 25W चा फायदा तसा काहीच होणार नाही. वेळ तेवढाच लागण्याची शक्यता आहे. कारण नव्या आयफोनमध्ये बॅटरी आताच्यापेक्षा मोठी दिली जाणार आहे. सॅमसंग गॅलॅक्सी S21मध्ये 25W चा चार्जर येतो. 

कधी लाँच होणार... (Apple iPhone 13 launch date)
आयफोन 13 सीरीज ही सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग (LiDAR) स्कॅनिंग टेक्नॉलॉजी देण्यात येईल. अ‍ॅपल वॉचसारखा ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि वाय फाय 6E कनेक्टिव्हीटी देण्यात य़ेण्याची शक्यता आहे. पर्ल आणि सनसेट गोल्ड या दोन नवीन रंगांत फोन लाँच हेण्याची शक्यता आहे. तसेच वायरलेस चार्जिंगदेखील मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Apple iPhone 13 to support 25W wired charging; Adapter, cable price too high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल