शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

iPhone 13 मध्ये मिळणार DSLR सारखा व्हिडीओ पोट्रेट मोड; नवीन कॅमेरा फीचर्स झाले लीक 

By सिद्धेश जाधव | Published: August 11, 2021 6:18 PM

iPhone 13 Video Portrait: Apple यावर्षी कमीत कमी तीन नवीन कॅमेरा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर सादर करणार आहे. Apple नवीन फिल्टर सिस्टम देखील सादर करणार आहे.

ठळक मुद्देApple नवीन फिल्टर सिस्टम देखील सादर करणार आहे.आगामी आयफोन सीरिज जुन्या iPhone 12 च्या डिजाईनवर सादर होणार असली तरी यात छोटी नॉच देण्यात येईल.

Apple चे आयफोन्स लाँच होण्यापूर्वीच चर्चेत असतात. आता कंपनी आपली आगामी iPhone 13 सीरिज सप्टेंबर 2021 मध्ये सादर करणार आहे. या सीरिजमध्ये चार मॉडेल सादर केले जाऊ शकतात. ही आगामी सीरिज जुन्या iPhone 12 च्या डिजाईनसह सादर केली जाऊ शकते. परंतु यातील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये सुधार केला जाऊ शकतो. Apple आगामी iPhone च्या कॅमेरा आणि बॅटरीमध्ये मोठे बदल करू शकते. Bloomberg च्या रिपोर्टनुसार Apple यावर्षी कमीत कमी तीन नवीन कॅमेरा आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर सादर करणार आहे.  

Apple iPhone 13 सीरीजचे लीक कॅमेरा फीचर्स  

Bloomberg ने अ‍ॅप्पलच्या आगामी iPhone 13 लाइनअपमधील कॅमेरा फीचर्सची माहिती एका रिपोर्टमधून सांगितली आहे. त्यानुसार कंपनी आगामी आयफोनमध्ये व्हिडीओ पोर्टेट मोड देऊ शकते. या मोडद्वारे शूट केलेल्या व्हिडीओचा बॅकग्राऊंड ब्लर असेल. तसेच नवीन ProRes व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचर HD किंवा 4K क्लिप्स पोस्ट प्रोडक्शनसाठी हायर क्वालिटी फॉर्मेंटमध्ये साठवण्यास मदत करेल. जेणेकरून एडिटिंग करताना एडिटर्सना मदत होईल.  

फोटोजचा लूक आणि कलर सुधारण्यासाठी Apple नवीन फिल्टर सिस्टम देखील सादर करणार आहे. या फिचरमध्ये विविध फिल्टर्स दिले जातील. त्याचबरोबर युजर्स कलर टेंप्रेचर देखील सेट करू शकतात. आगामी iPhone 13 च्या प्रो व्हर्जनमध्ये तीन कॅमेरा सेन्सरसह LED फ्लॅश आणि LiDAR सेन्सर दिला जाऊ शकतो. आगामी आयफोन 5 पीस लेन्स ऐवजी 6-पीस लेन्ससह सादर केले जाऊ शकतात. अ‍ॅप्पल अनॅलिस्ट मिंग-ची कू यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रो मॉडेलमधील अल्ट्रावाईड कॅमेऱ्यात ऑटोफोकस सपोर्ट दिला जाऊ शकतो.  

Apple iPhone 13 चे संभाव्य स्पेसिफिकेशन  

आगामी आयफोन सीरिज जुन्या iPhone 12 च्या डिजाईनवर सादर होणार असली तरी यात छोटी नॉच देण्यात येईल. ईयरपीस स्पिकर टॉप बॅजलमध्ये टाकून नॉचचा आकार केला जाईल. आगामी आयफोनच्या प्रो मॉडेलमध्ये 120Hz LTPO डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच iPhone 13 लाइनअपमध्ये A15 Bionic चिपसेटसह 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या सीरिजमधील आयफोन्समध्ये आधीच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.  

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन