14 सप्टेंबरला लाँच होईल Apple iPhone 13 सीरिज; iPhone 13 mini, Pro आणि Pro Max होणार सादर  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:26 PM2021-06-23T16:26:50+5:302021-06-23T16:28:11+5:30

Apple iPhone 13 Series: Apple iPhone 13 सीरिज 14 सप्टेंबरला लाँच होईल, त्यानंतर 24 सप्टेंबरपासून हे फोन्स विकत घेता येतील.

Apple iPhone 13 launch: Apple iPhone 13 सीरिज 14 सप्टेंबरला लाँच होईल आणि त्याच महिन्यात 24 सप्टेंबरला खरेदीसाठी उपलब्ध होईल.   | 14 सप्टेंबरला लाँच होईल Apple iPhone 13 सीरिज; iPhone 13 mini, Pro आणि Pro Max होणार सादर  

या सीरीजमध्ये आयफोन 13 सोबत आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स लाँच केले जाऊ शकतात.  

Next

Apple च्या नवीन स्मार्टफोन्सची प्रतीक्षा अ‍ॅप्पलच्या चाहत्यांसोबतच जगभरातील टेक प्रेमींना असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने WWDC 2021 च्या माध्यमातून iOS 15 ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे. त्यामुळे आता लोक iPhone 13 सीरिजच्या लाँचसाठी उत्सुक आहेत. ऑनलाईन लिक्समधून समोर आले आहे कि कंपनी 14 सप्टेंबरला Apple iPhone 13 Series लाँच करेल. या सीरिजमध्ये iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max हे स्मार्टफोन्स लाँच केले जाऊ शकतात.  

iPhone 13 Series ची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही, परंतु ऑनलाईन लिक्समधून समजले आहे कि आयफोन 13 सीरीज 14 सप्टेंबरला लाँच करण्यात येईल. 14 सप्टेंबरला लाँच झाल्यानंतर iPhone 13 सीरीज त्याच महिन्यात 24 सप्टेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल. या सीरीजमध्ये आयफोन 13 सोबत आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स लाँच केले जाऊ शकतात.  

Apple ने आयफोन 13 सीरीजबद्दल कोणतीही ठोस माहिती दिली नाही. iPhone 13 mini मध्ये कंपनी 2,406mAh ची बॅटरी मिळू शकते, असे लीकमधून समोर आले. तसेच iPhone 13 मध्ये 3,095mAh बॅटरी आणि iPhone 13 Pro व iPhone 13 Pro Max मध्ये 4,352mAh ची बॅटरी मिळू शकते.  

यावेळी अ‍ॅप्पल हाय रिफ्रेश रेट असलेले स्मार्टफोन्स लाँच करू शकते. Apple iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये 120Hz रिफ्रेश रेट LTPO AMOLED स्क्रीन देण्यात येईल, अशी माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. उपरोक्त माहिती लीकच्या माध्यमातून समोर आल्यामुळे जोपर्यंत हे स्मार्टफोन्स लाँच होत नाहीत तोपर्यंत यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.  

Web Title: Apple iPhone 13 launch: Apple iPhone 13 सीरिज 14 सप्टेंबरला लाँच होईल आणि त्याच महिन्यात 24 सप्टेंबरला खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.