Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 03:14 PM2022-07-08T15:14:25+5:302022-07-08T15:15:46+5:30

iPhone Update: अ‍ॅपल लवकरच एक असं तंत्रज्ञान विकसीत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही भर पावसातही iPhone वापरू शकणार आहात. कंपनीनं याचं पेटंट देखील सिक्युर केलं आहे.

apple filed a patent suggest iphone users will type in rain | Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार

Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार

googlenewsNext

iPhone Update: अ‍ॅपल लवकरच एक असं तंत्रज्ञान विकसीत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही भर पावसातही iPhone वापरू शकणार आहात. कंपनीनं याचं पेटंट देखील सिक्युर केलं आहे. सध्याचे iPhone वॉटर रेजिस्टंट असले तरी पावसात ते वापरणं अजूनही खूप कठीण आहे. पावसात फोनच्या डिस्प्लेवर पाणी पडल्यामुळे स्क्रीन टच व्यवस्थित काम करत नाही. अशावेळी फोनचा वापर करणं खूप कठीण होऊन बसतं. 

अ‍ॅपल कंपनीनं नेमकं याच समस्येवर तोडगा काढण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी नव्या फोनमध्ये 'वेट मोड' सारखं एक जबरदस्त फिचर दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे आयफोन आता ऋतूनुसार टच सेन्सिटिव्ह अ‍ॅडजस्टेबल असणार आहेत. USPTO नं ब्रँडनं लेटेस्ट पेटंटसाठी मंजुरी देखील दिली आहे. 

कसं काम करणार iPhone?
पेटंटनुसार अ‍ॅपल कंपनी आपले स्मार्टफोन पावसात देखील काम करु शकतील अशा पातळीवर अपडेट करण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनी स्मार्टफोनमध्ये इन-बिल्ट प्रेशर आणि मॉस्चर सेंसर देऊ शकते. हे सेंसर पाण्याचं अस्तित्व ओळखून त्यानुसार स्क्रीनची क्षमता अ‍ॅडजस्ट करू शकतील. सॉफ्टवेअर ऑन-स्क्रीन बटन्समध्ये काही बदल केले जातील. जेणेकरुन पावसात अक्सीडेंटल टचची भीती राहणार नाही. 

कंपनीनं पेटंट फायलिंगमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये मॉस्चर डिटेक्टर देण्यात येणार आहे. जे स्मार्टफोनच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरवर अस्तित्वात असलेल्या मॉस्चरला डिटेक्ट करतील. एका ठराविक क्षमतेपेक्षा अधिक फोन ओला झाल्यास प्रोसेसर टच इवेंटची पोझिशन बदलली जाईल. 

मिळणार बरेच 'मोड्स' 
पेटंट डॉक्यूमेंटमधील माहितीनुसार टच रिस्पॉन्स फिचरला कॉन्फिगर करण्यासाठी वेगवेगळे मोड्स देखील देण्यात येऊ शकतात. यात वेट, ड्राय आणि अंडर-वॉटर मोड दिलं जाऊ शकतं. वेट आणि ड्राय मोडमध्ये iPhone फोर्स इनपूटमध्ये बदल केला जाऊ शकतो. ज्यात चांगल्या क्षमतेचा टच इनपूट मिळू शकेल.

Web Title: apple filed a patent suggest iphone users will type in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.