शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

Apple Event 2020: अ‍ॅपलकडून नवीन वॉच सीरिज, आयपॅड लॉन्च; जाणून घ्या किमती अन् वैशिष्ट्यं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 00:48 IST

Apple Event 2020: नव्या वॉच सीरिज, आयपॅडमध्ये अनेक दमदार फीचर्स

अ‍ॅपलनं एका खास कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या उत्पादनाचं लॉन्चिंग केलं. कोरोना संकट असल्यानं संपूर्ण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला. अ‍ॅपलनं नवीन वॉच सीरिज, आयपॅड, आयपॅड एअर लॉन्च केलं आहे. यामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स देण्यात आली आहे. कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे.

अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लॉन्च करण्यात आली आहे. या सीरिजची किंमत ३९९ अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. रक्तातील ऑक्सिजन अवघ्या १५ सेकंदांत मोजण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. भारतात Apple Watch 6 Series (GPS) ची किंमत ४० हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल. तर Apple Watch Series 6 (GPS Cellular) ४९ हजार ९०० रुपयांनी सुरू होईल. Apple Watch SE (GPS) ची किंमत तुलनेनं कमी आहे. हे स्मार्टवॉच २९ हजार ९०० रुपयांपासून उपलब्ध असेल. तर Apple Watch SE (GPS Cellular) ची किंमत ३३ हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल.
iPad (8th generation) मध्ये पेन्सिल आणि रेटिना डिस्प्लेची सुविधा देण्यात आली आहे. आयपॅडमध्ये A12 चिपसेटचा वापर करण्यात आला असून गेमिंगची आवड असणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. वाय-फाय मॉडेल, वाय-फाय अधिक सेल्युलर मॉडेल अशा विविध सुविधांसह आयपॅड उपलब्ध होईल. त्यात ३२ जीबी आणि १२८ जीबी असे पर्याय आहेत. त्यांची किंमत २९ हजार ९०० रुपयांपासून ४१ हजार ९०० रुपयांपर्यंत असेल.
आयपॅड एअर (iPad Air) भारतात ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. आयपॅड एअरच्या वायफाय मॉडेलची किंमत ५४ हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल. तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत ६६ हजार ९०० रुपयांपासून सुरू होईल. ६४ जीबी आणि २५६ जीबी अशा दोन पर्यायांमध्ये आयपॅड एअर उपलब्ध असेल.

टॅग्स :Apple Incअॅपल