शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चीनला आणखी एक तगडा झटका, Apple भारतात आणखी एक फॅक्ट्री सुरू करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:53 IST

उत्पादन आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर चीनला सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवी दिल्ली- 

उत्पादन आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर चीनला सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमेरिकन कंपन्या आपला व्यवसाय चीनमधून इतर देशांमध्ये स्थलांतरीत करत आहेत. सध्या भारत हे अमेरिकन कंपन्यांचे आवडते ठिकाण आहे. अ‍ॅपलने आपला संपूर्ण व्यवसाय चीनमधून काढून भारतात आणण्याचं ठरवलं आहे. अ‍ॅपलची तैवानची पुरवठादार कंपनी भारतात आणखी एक कारखाना सुरू करण्यासाठी जमीन शोधत आहे. या नवीन कारखान्यात नवीन आयफोन असेंबल केले जातील. 

Apple Inc चे तैवानी पुरवठादार Pegatron Corp भारतात आणखी एक कारखाना उघडणार आहे. खरंतर, अ‍ॅपल चीनवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे, ज्यामुळे त्याच्या पुरवठादार कंपन्या भारताकडे वळत आहेत. सुमारे ६ महिन्यांपूर्वी, Pegatron तामिळनाडू राज्यातील चेन्नई या दक्षिणेकडील शहराजवळ दुसरा कारखाना सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यापूर्वी, पेगाट्रॉनने १५० दशलक्ष डॉलरर्सची गुंतवणूक केली होती. नवीन आयफोन असेंबल करण्याचे काम नवीन फॅक्टरीत केले जाणार आहे. पेगाट्रॉनने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे, मात्र नियमांच्या आधारे मालमत्तेचा ताबा जाहीर केला जाईल, असे निश्चितपणे सांगितले आहे. अ‍ॅपलकडून कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

एका वर्षात ९ अब्ज डॉलरची फोन निर्यातकंपनीच्या वाढीसाठी भारताकडे मोठ्या आशेनं पाहिलं जात आहे. इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या मते, एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान भारतातून जवळपास ९ अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले गेले आहेत, ज्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक आयफोनचा वाटा आहे. रिसर्च फर्म काउंटरपॉईंटने सांगितले की, पेगाट्रॉनचा वाटा सध्या भारतात आयफोन उत्पादनात वार्षिक आधारावर १० टक्के इतका आहे.

कारखाना याआधीपेक्षा थोडा लहानअमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी Apple आणि त्याचे मुख्य पुरवठादार चीनमधून उत्पादन स्थलांतरीत करत आहेत. भाडेतत्त्वावर दुसरी Pegatron सुविधा सुरू करण्यासाठी बोलणी सुरू आहेत आणि ती चेन्नईजवळ महिंद्रा वर्ल्ड सिटीमध्ये असेल, जिथे कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्या प्लांटचे उद्घाटन केले. मिळालेल्या माहितीनुसार, Pegatron चा दुसरा कारखाना पहिल्यापेक्षा थोडा लहान असू शकतो. Apple Inc ने भारतावर मोठा विश्वास दाखवला आहे. अ‍ॅपलने २०१७ मध्ये विस्ट्रॉन आणि नंतर फॉक्सकॉनच्या माध्यमातून देशात आयफोन असेंबल करण्यास सुरुवात केली.

इतर कंपन्यांनाही मान्यताभारत ही जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे, जिथे Apple ने iPad टॅब्लेट आणि AirPods असेंबल करण्याची योजना देखील आखली आहे. भारताच्या कर्नाटक राज्याने या आठवड्यात फॉक्सकॉनच्या ९६८ दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. ज्यामुळे ५०,००० नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात, रॉयटर्सच्या वृत्तानुसार फॉक्सकॉनने करार जिंकल्यानंतर Apple साठी वायरलेस इयरफोन बनवण्यासाठी भारतात २०० दशलक्ष डॉलर्स खर्चून कारखाना तयार करण्याची योजना आखली आहे. ते तामिळनाडूतील त्यांच्या प्लांटमध्ये काही आयफोन मॉडेल्स आधीच असेंबल करत आहे.

टॅग्स :Apple Incअॅपल