जास्त खर्च न करता विकत घेता येणार हे Smartwatch; फुल चार्जवर 7 दिवसांचा बॅकअप
By सिद्धेश जाधव | Updated: March 24, 2022 18:08 IST2022-03-24T18:04:46+5:302022-03-24T18:08:45+5:30
Ambrane FitShot Surge स्मार्टवॉच SpO2, ब्लड प्रेशर, हार्ट रेट, कॅलरी, स्लीप, पेडोमीटर, ब्रीद ट्रेनिंग आणि स्ट्रेस मॉनिटरिंगला सपोर्ट करतं.

जास्त खर्च न करता विकत घेता येणार हे Smartwatch; फुल चार्जवर 7 दिवसांचा बॅकअप
Ambrane नं गेल्या एका महिन्यात एक-दोन नव्हे तर 6 नवीन स्मार्टवॉच सादर केले आहेत. आता कंपनीनं आपल्या फिटशॉट सीरिजमध्ये Ambrane FitShot Surge स्मार्टवॉचची भर टाकली आहे. हे स्मार्टवॉच आहे. स्मार्टवॉच SpO2, ब्लड प्रेशर, हार्ट रेट, कॅलरी, स्लीप, पेडोमीटर, ब्रीद ट्रेनिंग आणि स्ट्रेस मॉनिटरिंगला सपोर्ट करतं. याची किंमत देखील कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे.
Ambrane FitShot Surge चे स्पेसिफिकेशन
Ambrane FitShot Surge मध्ये 1.28 इंचाचा फुल टच स्क्रीन डिस्प्ले मिळतो. या वर्तुळाकार आयपीएस एलसीडी डिस्प्लेला 2.5डी ओजीएस कर्व्ड ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. कंपनीनं यात हलक्या डिजाईनचा वापर केला आहे. तसेच यात एक प्रीमियम रस्ट-प्रूफ जिंक अलॉय बॉडी देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच IP68 वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आलं आहे.
Ambrane FitShot Surge मध्ये SpO2, ब्लड प्रेशर, हार्ट रेट, कॅलरी, स्लीप, पेडोमीटर, ब्रीद ट्रेनिंग आणि स्ट्रेस मॉनिटरिंग सारखे हेल्थ फीचर्स मिळतात. या वॉचच्या मदतीनं स्मार्टफोनचा कॅमेरा आणि म्यूजिक कंट्रोल करता येतं. तर यात कस्टमायजेशनसाठी 75+ वॉच फेस देण्यात आले आहेत. हे वॉच सिंगल चार्जवर 7 दिवस वापरता येईल, असा दावा कंपनीनं केला आहे.
Ambrane FitShot Surge ची किंमत
Ambrane FitShot Surge ची किंमत 1999 रुपये आहे. सोबत कंपनी एक वर्षाची वॉरंटी देत आहे. या वॉचचे रोज पिंक आणि झेड ब्लॅक कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत. हे वॉच तुम्ही ई-कॉमर्स साइट Flipkart च्या माध्यमातून विकत घेऊ शकते.